Satara : ३६ हजार सातारकरांनी दिले मोदींना धन्यवाद; सातारा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

सातारा जिल्ह्यातून Satara दोन लाख पत्रे Two lakh Letters मोदींना Narendra Modi पाठविण्याचे टार्गेट जिल्हा भाजपने BJP ठेवले आहे. त्यासाठीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.
Thanks Modiji
Thanks Modijisarkarnama

सातारा : धन्यवाद मोदीजी उपक्रमात महाराष्ट्रात सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यातून मोदींना धन्यवाद देणारी तब्बल ३६ हजार पत्रे लिहिली असून ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सुपूर्द केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या २७ योजनांचा लाभ महाराष्ट्रातील १३ कोटींपैकी पाच कोटी पाच लाख नागरीकांना आतापर्यंत मिळाला आहे. ज्या नागरीकांना मोदींनी सुरू केलेल्या योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या नागरीकांकडून मोदींजींना धन्यवाद म्हणणारी पत्रे पाठविण्याची माोहिम भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार भाजपचे सातारचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी पत्र लिहिण्याची मोहिम राबवली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ३६ हजार नागरीकांनी मोदींना धन्यवाद देणारी पत्रे लिहिली आहेत. ही पत्रे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Thanks Modiji
Maan : जिहे-कटापूर योजना सौर ऊर्जेवर चालविणार... जयकुमार गोरे

सातारा जिल्ह्यातून दोन लाख पत्रे मोदींना पाठविण्याचे टार्गेट जिल्हा भाजपने ठेवले आहे. त्यासाठीचे काम जिल्ह्यात सुरू आहे. लवकरच उर्वरित पत्रेही लाभ घेतलेल्या नागरीकांकडून घेऊन ती मोदींकडे पाठवली जाणार आहेत. या उपक्रमात सातारा जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Thanks Modiji
Satara : अजितदादांच्या नॉट रिचेबलवर बावनकुळे हसले अन्‌ म्हणाले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in