भाजप काळात 'ईडी'चे 2900 छापे; एकावरही आरोपपत्र ना गुन्हा...

ओबीसी आरक्षणाचेही OBC Reservation श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे-फडणवीस Shinde-fadanvis सरकारकडून government सुरू आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड : प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉड्रिंग कायद्यांची निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली. त्याअंतर्गत 'ईडी'ची स्थापना झाली. काँग्रेस काळात केवळ 27 छापे टाकून दोषींवर कारवाई झाली. मात्र, भाजपच्या आठ वर्षाच्या काळात ईडीने तब्बल 2900 छापे टाकले. त्या छाप्यात एकाचेही आरोपपत्र दाखल नाही, एकावरही गुन्हा नाही. केवळ दहशत माजवण्यासाठीच भाजपने ईडीचा वापर केला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अराजकतेला मोदी सरकारच कारणीभूत असेल, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषेदत केली.

काँग्रेसतर्फे आज कराडात आंदोलन झाले. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, ईडीची भिती दाखवून भाजपकडून दहशत निर्माण केली जात आहे. सत्ता आणण्यासाठी ईडीचा वापर केला जातो आहे, मनी लॉड्रिंगव्दारे दहशतवादी संघटनांना पैसा पुरवला जातो काय, याची चौकशी करण्यासाठी ईडीची निर्मिती केली गेली. मात्र, तीच ईडी सर्वसामान्य लोकांच्या विरोधात, नेत्यांच्या विरोधात सऱ्हास वापरली जात आहे.

Prithviraj Chavan
Satara : 'ईडी'ची भीती दाखवून राज्यात सत्ता मिळवली... पृथ्वीराज चव्हाण

ईडीच्या अतिरिक्त अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. आजअखेर 2900 छापे ईडी टाकले. त्यातील एकालाही शिक्षा झालेली नाही. एकाचेही आरोपपत्र दाखल नाही. केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपली सत्ता अबाधित ठेवायची, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडून दुर्लक्ष करायचे उद्योग सुरू आहेत. देशातील सर्वाधिक अपयशी सरकार म्हणून मोदी सरकारचा उल्लेख आहे. सरकारची आकडेवारी, वाढणारी बेरोजगारी या सगळ्या गोष्टी त्याचेच निर्देश असताना विरोधक संपून हुकूमशाही आणण्याचा घाट घातला जातो आहे.

Prithviraj Chavan
ठाण्याची दाढी योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम करते... महेश शिंदे

भाजपने शिवसेना फोडली, त्या मागे कुटील कारस्थान आहे. शिवसेना व त्यांचा धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवले की, शिवसेनेला पडणारी हिंदुत्वादी मते भाजपच्या पारड्यात आपसूक येतील. त्यातून भाजप पुन्हा संघटनात्मक पातळीवर मजबूत होईल, हा उद्देश आहे. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह गोठले गेले तर त्यांचा आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ओबीसी आरक्षणाचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरू आहे.

Prithviraj Chavan
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

वास्तविक ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये पहिल्यांदा 27 टक्के ओबीसींना राजकीय आरक्षण दिले. त्यात काही ठिकाणी त्या आरक्षणामुळे 50 टक्क्याहून अधिक आरक्षण दिल्याची नोंद झाली. पर्यायाने तो मुद्दा न्याय प्रविष्ठ झाला. त्यावर अद्यापही निर्णय नव्हता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी बांठिया आयोग स्थापन केला. त्या आयोगाने केलेल्या अभ्यासानुसार सादर केलेल्या अहवालाला सर्वोच्च मान्यता मिळाल्याने पुन्हा ओबीसींना आरक्षण लागू झाले. त्यामुळे येथे श्रेयवादाचा प्रश्नच नाही. सरकार पायगुणावरही चालत नाही. ते गुणवत्तेवरच चालते, याचा बहुतेक त्यांना विसर पडल्याचे दिसते.

Prithviraj Chavan
शिंदे-फडणवीस सरकार येण्याची पायाभरणी करणारा नेता आज त्यांना भेटला...

शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिंदे-फडणवीस यांचे सरकार घटनाबाह्य सरकार आहे. दोन व्यक्तींचे सरकार असू शकत नाही. किमान 12 व्यक्तींचे सरकार असले पाहिजे, अशी घटनेत तरतूद आहे. त्यामुळे दोन व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयावरही अनेक शंका आहेत. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार माहिती नाही. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपकडून न्यायालयात दाद मागितली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in