२०१९ मध्ये महापुराच्या पाण्यात उभं राहुन जीआर काढण्याचे आदेश देवेंद्रजींनी दिले होते...

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येक पूरग्रस्ताची एक-एक गरज पूर्ण केली : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil News, BJP News in Marathi, Chandrakant Patil Latest Marathi News
Chandrakant Patil News, BJP News in Marathi, Chandrakant Patil Latest Marathi NewsSarkarnama

कोल्हापूर : २०१९ मध्ये महापूर अचानक आला होता, तरीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्येक पूरग्रस्ताची प्रत्येक गरज पूर्ण केली. कितीही पूर असला, तरी पाण्यात उभं राहून जीआर काढा, असे आदेश त्यांनी दिले होते, असं सांगत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कौतुक केले. ते पुरग्रस्तांच्या 'टाहो मोर्चात' बोलत होते. (Chandrakant Patil Latest News)

चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, २०१९ साली जवळपास १४ वर्षांनंतर महापूर आला होता. त्यापूर्वी २००५ साली महापूर आला होता. तो तर फारच भयंकर होता. अख्खी मुंबई पाण्यामध्ये होती. लोकं तीन-तीन दिवस स्वतःच्या गाड्यांमध्ये अडकली होती. त्यानंतर २०१९ साली अचानक महापूर आला. काहीही ध्यानीमनी नव्हते. मात्र अशा परिस्थितीतही देवेंद्रजींनी सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणारी एक-एक गोष्ट पूर्ण केली.

Chandrakant Patil News, BJP News in Marathi, Chandrakant Patil Latest Marathi News
महाडिकांच्या विजयाची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर; भाजपची टॉप टू बॉटम यंत्रणा कामाला

आपल्या मुंबई ते कोल्हापूर प्रवासाचा किस्सा सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला आठवतं, हायवे बंद होता. मी कराडपर्यंत येवून परत मुंबईला गेलो. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोहत जा, पण तुम्हाला कोल्हापूरला पोहचायला लागेल. वैमानिक तयार नव्हता. तो म्हणाला, तुम्ही कॅबिनेट मिनीस्टर आहात. मला असं करता येणार नाही, त्यावेळी त्याला म्हणालो, मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहुन देतो माझ्या जीवाची जबाबदारी मी घेतो, पण मला कोल्हापूरमध्ये पोहचावं लागेल. त्यानंतर प्रचंड पाऊस पडतं असताना देखील मी कोल्हापूरच्या विमानतळावर उतरलो.

Chandrakant Patil News, BJP News in Marathi, Chandrakant Patil Latest Marathi News
लखीमपूर खीरी प्रकरणातील साक्षीदारावर हल्ला; सुरक्षारक्षक सोबत नसल्याचे पाहुन साधला डाव

त्यानंतर पूर संपून लोकं आपपल्या घरी गेले. घराघरांमध्ये चिखलाचे ढीग साठले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिकांचे कर्मचारी बोलावून ते ढीग साफ केलं. माती १५-१५ दिवस पाण्यामध्ये राहिल्याने त्याला वास येत होता. एक एजन्सी बोलावून फवाऱ्याच्या सहाय्याने तो वास घालवला. असं पुराच्या काळात देवेंद्रजी म्हणाले, पाण्यात उभं राहुन जीआर काढायचे. तिथे लक्षात आले ना की कपडे-भांड्यांसाठी १५ हजार रुपये देण्याची गरज आहे, तर पाण्यात उभं राहुन जीआर काढायचे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com