Satara Congress News : लोकसभेसाठी मोदींविरोधात २० पक्ष एकत्र येणार...पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan काँग्रेस भवनात आढावा बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, मोदींच्या नऊ वर्षांच्या कारभारावर काँग्रेस अंकुश ठेवणार आहे.
Narendra Modi, Prithviraj Chavan
Narendra Modi, Prithviraj Chavansarkarnama

Satara News : कर्नाटकच्या निवडणुकीत मिशन लोटस भाजप यशस्वी करु शकली नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप व मोदींची जादू चालणार नाही, हे सिध्द झाले आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदींविरोधात २० पक्ष एकत्र येऊन लढणार आहोत. या निवडणुकीत भाजप सत्तेतून हद्दपार होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेस भवनात आढावा बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, मोदींच्या Narendra Modi नऊ वर्षांच्या कारभारावर काँग्रेस अंकुश ठेवणार आहे. महागाई, बेरोजगारी, महिला, युवतींवर अन्याय, अत्याचार, शेतकरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, उद्योगधंद्यांची झालेली पीछेहाट आदी मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहोत. काँग्रेसने Congress संघटीत लढा दिल्यास मोदींचा पराभव होवू शकतो.

कर्नाटक निवडणुकीत भाजप आणि मोदी यांचा पराभव झाल्याने भाजपने वेगवेगळी अभियाने सुरु केली आहेत. देशात मोदींविरोधात २० पक्ष एकत्र येणार असून २०२४ च्या निवडणुकीत भाजप आणि मोदी हटाव हा एककलमी राबवला जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार असून भाजपविरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल.

Narendra Modi, Prithviraj Chavan
Protest Of Disabled In Satara: पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिव्यांगांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा अन्‌ पोलिसांची जबरदस्ती

मतविभागणी टळल्यास भाजपचा पराभव अटळ आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपात महाविकास आघाडीत तिन्ही घटकांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. जागा वाटपावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल. जातीय तेढ निर्माण करुन समाजासमाजात वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.

Narendra Modi, Prithviraj Chavan
Sharad Pawar यांचे BJPबाबत विधान, Devendra Fadanvisचा पलटवार | NCP | BJP | Navi Mumbai Airport

ब्रिजभूषणवर कारवाईला मोदी सरकार घाबरतंय....

महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सात तक्रारी दिल्ली पोलिसांत दाखल आहेत, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यामुळे खासदार ब्रिज भूषण सिंह याला कायद्याप्रमाणे अटक केले पाहिजे. पण, भाजपचा उत्तर प्रदेशातील तो दबंग, बाहुबली खासदार बाहुबली खासदार असून ठाकूर समाजातील आहे. तसेच अनेक जिल्हयात त्यांचा राजकीय प्रभाव आहे.

त्यामुळे मोदींचे सरकार त्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे. स्वत: पंतप्रधानांनी याविषयी चाकर शब्द काढलेला नाही. यातून मोदींचा बेटी बचाव, बेटी पढाओ चा नारा फेल ठरत आहे. त्याला अटक करुन कडक शिक्षा झाली पाहिजे.या मुद्यावर काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

Narendra Modi, Prithviraj Chavan
Kolhapur Hindu Morcha : कोल्हापूर पेटलं ; आंदोलक-पोलिसांमध्ये धक्काबुक्की ; शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com