लिहून ठेवा, २०२४ मध्ये राज्यात भाजपचे ४३ खासदार अन् १७० आमदार : चंद्रकांत पाटील

BJP | Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमध्ये मोठा दावा
लिहून ठेवा, २०२४ मध्ये राज्यात भाजपचे ४३ खासदार अन् १७० आमदार : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil | Dhananjay Mahadik Sarkarnama

कोल्हापूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी भाजपचे ४२ ते ४३ खासदार निवडून येणार. तसेच विधानसभा निवडणुकीतही भाजपचे २८८ पैकी १६० ते १७० आमदार निवडून येणार आहेत, असा दावा भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या विजयी मिरवणुकीत बोलत होते. (BJP | Chandrakant Patil Latest News)

खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत चंद्रकांत पाटील यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान दाखवावे लागते. तरीही ही निवडणूक आम्ही जिंकली. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान असते. म्हणूनच मी म्हणालो होतो ‘ये तो अभी झाकी है, बिस तारीख बाकी है’.

महाविकास आघाडीच्या कारभाराला जनतचा नव्हे तर आमदारही त्रासले आहेत. त्यांची कामे होत नाहीत. मंत्री भेटत नाहीत. त्यांची नाराजगी राज्यसभेच्या निवडणुकीतून दिसून आली. महाविकास आघाडीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. त्यामुळेच ते आता काहीही आरोप करत आहेत, असेही पाटील म्हणाले. (BJP | Chandrakant Patil Latest News)

जिल्ह्यात राजकारणावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांचा प्रचंड उन्माद आणि उच्छाद सुरू आहे. त्याला प्रशासनाची साथ आहे. कोणावरही केसेस टाक, कोणालाही आत टाक इथ पासून ते राजारामपुरीतील अतिक्रमण कारवाई पर्यंत सर्व काही सुरू आहे. आता धनंजय महाडिक यांना बळ मिळाले आहे. अर्ध्यारात्रीही ते कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जातील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा उन्माद आता चालणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in