Ramdas Tadas
Ramdas TadasSarkarnama

शिवसेनेचे 12 खासदार देणार शिंदे गटाला पाठिंबा : भाजप खासदार तडस यांचे वक्तव्य

वर्ध्यातील भाजपचे खासदार रामदास तडस ( Ramdas Tadas ) हे काल ( रविवारी ) रात्री शिर्डी येथे आले होते.

अहमदनगर - राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शिवसेनेच्या खासदारांनीही बंडाचे संकेत देण्यास सुरवात केली आहे. वर्ध्यातील भाजपचे खासदार रामदास तडस ( Ramdas Tadas ) हे काल ( रविवारी ) रात्री शिर्डी येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे 12 खासदार लवकरच एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. ( 12 Shiv Sena MPs to support Shinde group: BJP MP Tadas's statement )

खासदार रामदास तडस म्हणाले की, शिवसेना खासदारांत फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिवसेनेचे 12 खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तातील गटाला लवकरच पाठिंबा देणार आहेत, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

Ramdas Tadas
खासदार सदाशिव लोखंडेंना भाजपची ओढ : उद्धव ठाकरेंसमोर मांडणार भुमिका

ते पुढे म्हणाले की, जनतेच्या विकासाच्या दृष्टीने जनतेने त्यांना निवडून दिलेले असताना त्याच्या मतदार संघात विकासच झाला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, देशाचे संरक्षण करण्यासाठी, हिंदुत्त्व टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला शिवसेना खासदार पाठिंबा देणार, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांनी कालच ( रविवारी ) शिवसेनेच्या खासदारांनी भाजपबरोबर जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तसेच लोखंडे हे या संदर्भात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in