शिवद्रोही छिंदम बंधूंसह 11 जण हद्दपार : नगरच्या पोलिसांची कारवाई

श्रीपाद छिंदम मागील शुक्लकाष्ट काही थांबताना दिसत नसल्याची चिन्हे आहेत.
Shripad Chhindam
Shripad ChhindamSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेने शिवद्रोही श्रीपाद छिंदम व त्याचा बंधू श्रीकांत छिंदम यांच्यासह 11 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे श्रीपाद छिंदम मागील शुक्लकाष्ट काही थांबताना दिसत नसल्याची चिन्हे आहेत. ( 11 deported including Shivdrohi Chhindam brothers: Action taken by SP of the town )

एककाळ अहमदनगर महापालिकेत उपमहापौर राहिलेल्या श्रीपाद छिंदमने महापालिकेच्या एका कर्मचाऱ्या बरोबर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे तो राज्यभर टीकेचा विषय ठरला होता. श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांच्यावर यापूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशा गंभीर गुन्हे करणाऱ्या 11 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

Shripad Chhindam
छिंदम पुन्हा तोंडघशी : निवडणूक स्थगितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

छिंदम बंधू

छिंदम बंधूंच्या ( रा. मोहनबाग, दिल्लीगेट, अहमदनगर ) विरोधात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात सात गुन्ह्यांची नोंद आहे. यात मारहाण करून गंभीर दुखापत करणे, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मालमत्तांचे नुकसान करणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. या दोघांना एक वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Shripad Chhindam
नामांतरावरून सुजय विखेंनी सुनावले मुख्यमंत्र्यांना खडे बोल : म्हणाले...

संदीप घुगे टोळी

संगमनेर व परिसरात सक्रीय असलेल्या संदीप भाऊसाहेब घुगे व त्याच्या टोळीतील 5 जणांना संगमनेर, राहाता व राहुरी तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यात संदीप घुगे ( वय 39), मारूती सगाजी नागरे ( वय 62), विजय बच्चू डोंगरे ( वय 44 ), अमोल सोमनाथ डोंगरे ( वय 28), दीपक सोमनाथ डोंगरे ( वय 27 ) व शशिकांत (मंगेश) शिवाजी नागरे ( वय 22 ) यांचा यात समावेश आहे. हे सर्वजण संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, मारामारी करणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

Shripad Chhindam
Video: नामांतरावरून सुजय विखेंनी सुनावले मुख्यमंत्र्यांना खडे बोल

अविनाश जायभाय टोळी

अहमदनगर शहरात सक्रीय असलेल्या अविनाश जायभाय टोळीला 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. टोळीत अविनाश विश्वास जायभाय ( वय 24, रा. दूधसागर सोसायटी, केडगाव), ऋषिकेश अशोक बडे ( वय 23, रा. भगवानबाबा नगर, सारसनगर), नितीन (किरण) किसन लाड ( वय 22, रा. भगवानबाबा नगर, सारसनगर) यांचा समावेश आहे. या टोळी विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, खंडणी गोळा करणे, दुखापत करून मौल्यवान वस्तू हिसकावणे, घातक हत्याराने दुखापत करणे, मालमत्तेची नुकसान आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील अक्षय सुभाष सोनवणे ( वय 26 ) याला 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात मारहान करून गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी असे दोन गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com