मला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करा ; परमबीर सिंहांची विनंती

परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ''आपल्याला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करा,'' अशी मागणी परमबीर सिंह यांनी या याचिकेत केली आहे.
मला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करा ; परमबीर सिंहांची विनंती
Param Bir Singhsarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे काल २३१ दिवसांनी गुन्हे शाखेत हजर झाले. ते मे महिन्यापासून फरार होते. गुरूवारी त्यांची सात तास चैाकशी करण्यात आली. या चौकशीत परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले. ''सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मी तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत बिनबुडाचे आहेत,'' असं परमबीर सिंग यांनी सांगितलं.

परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ''आपल्याला फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करा,'' अशी मागणी परमबीर सिंह यांनी या याचिकेत केली आहे. अधिवक्ता गुंजन मंगला यांच्या माध्यमातून त्यांनी सत्र न्यायाधीश एस.बी.भाजीपाले यांच्याकडे ही याचिका दाखल केली आहे.

परमबीर सिंग हे सर्वात आधी मुंबई विमानतळावरून कांदिवली येथील गुन्हे शाखा युनिट अकराच्या कक्षात चौकशीसाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी ''मी तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्यास आलो असून मला न्याय मिळेल अशी आशा मला आहे,'' असे माध्यमांशी बोलताना सांगितलं. याठिकाणी त्यांची सात तास त्यांची चौकशी झाली.

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई, ठाणे या ठिकाणी सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्या विरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असंही परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

 Param Bir Singh
आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटलांची सावध भूमिका

''आपण देशातच असून आपल्या जीवाला धोका आहे असं सांगत सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यास आपण चौकशीसाठी हजर राहू,'' असं परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. त्यानुसार ते चौकशीसाठी हजर राहिले होते. आता त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं जाईल असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप त्यांनी केला होता. अँटेलिया प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्यातला सचिन वाझेचा सहभाग आणि इतर सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने समोर आणल्या. ज्यानंतर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांना डी.जी. होमगार्ड हे पद दिलं.

परमबीर सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते. अखेर बुधवारी परमबीर सिंह यांचा मोबाईल चालु झाला आणि आता मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार घोषित केल्यावर ते समोर आले आहेत. त्यांना अटकेची भीती वाटायला लागल्यामुळे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Related Stories

No stories found.