`एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी`, राज्यात मोहिम राबवणार ; कृषी मंत्र्यांची घोषणा..

सगळ्या जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नविन योजना राबवल्या जाणार. (Minister Abdul Sattar)
Minister Abudl Sattar News,Mumbai
Minister Abudl Sattar News,MumbaiSarkarnama

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी, शेतात काम करतांना येणारे अडथळे, कर्ज व अन्य गोष्टी जवळून जाणून घेणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या दृष्टीकोनातून कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ` एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी` ही मोहिम राबवण्याची घोषणा केली आहे. (Farmers) सभागृहात सत्तार यांनी या मोहिमेची घोषणा करतांना माझ्यासह कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra) राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागचा हेतू असून राज्यात पुढील ९० दिवस ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील.

Minister Abudl Sattar News,Mumbai
Aurangabad : इम्तियाज जलील यांनी रिक्षा चालवण्याची हौस भागवली..

दिवसभर शेतकऱ्यांची दिनचर्या पाहतील, त्यांच्या अडचणी, त्यांचं जगणं समजून घेतील. ९० दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

मोहिम संपल्यानंतर सगळ्या जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नविन योजना राबवल्या जाणार असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in