Maharashtra News : महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून आता 'हे ' नाव चर्चेत; मोदी, शाहांचे विश्वासू म्हणून ओळख

Bhagat Singh Koshayri : भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु...
Maharashtra Governer
Maharashtra Governer Sarkarnama

Om Mathur News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीने आक्रमक पावित्रा घेतला होता. याचदरम्यान, कोश्यारींनी देखील आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी अनेक नावं समोर येत आहे. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंह तसेच सुमित्रा महाजन यांची नावं आघाडीवर होती. पण आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून ओम माथूर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच पदमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

मात्र, या यादीत आघाडीवर असणार्या नावांमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा समावेश होता.पण मध्यंतरीच्या काळातील महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे त्यांची राज्यपालपदी नियुक्ती कठीण आहे. तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचंही नाव पुढे आले होते. पण त्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Governer
Chinchwad by-Election: चिंचवडच्या निवडणुकीत रंगत : आघाडीत बिघाडी; राहुल कलाटे अपक्ष लढणार !

सुमित्रा महाजनांनी एका कार्यक्रमात बोलताना मला महाराष्ट्राचे राज्यपाल व्हायला आवडेल असं विधान केलं होतं. त्यामुळे त्यांचीही महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. महाजन यांना 2014 ते 2019 या काळात लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविल्यामुळे प्रदीर्घ घटनात्मक विषयाचा अभ्यास त्यांना आहे. त्याचबरोबर त्यांचा जन्म महाराष्ट्रातील चिपळूणचा आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व आणि चांगल्या महिला राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.मात्र त्या महाराष्ट्रातीलच असल्यानं त्यांच्या राज्यपालपदाची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayari) यांना पदावरून हटवण्यात यावे या मागणीसाठी राज्यातल्या विरोधकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे. राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी अनेकवेळा केंद्र सरकारकडे केली आहे. विरोधकांची मागणी होत असताना केंद्राने या संदर्भात कोणतीही हालचाल केलेली नाही. आता विरोधकांची मागणी शांत झाल्यानंतर कोश्यारी यांना हटवून त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यपाल करण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. मात्र, राणे यांची राज्यपाल म्हणून होणारी नियुक्ती महाराष्ट्रात नव्हे, तर इतर कोणत्याही राज्यात होऊ शकते अशी माहिती आहे.

Maharashtra Governer
MVA News: ...म्हणून महाविकास आघाडीतील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार, 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपच्या जवळची आणि महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यात कोण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com