सरकार नमणार? राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतून खडसे, सावंतांना वगळलं जाणार!

Bhagat Singh Koshyari | Mahavikas Aaghadi : एकनाथ खडसे, सचिन सावंत आमदारकीच्या रांगेतच राहणार...
Sachin Sawant News- Eknath khadse News Updates, Eknath Khadse Latest News Updates
Sachin Sawant News- Eknath khadse News Updates, Eknath Khadse Latest News Updatessarkarnama

मुंबई : राज्यपाल नियुक्त (Bhagat Singh Koshyari) १२ आमदारांच्या नावाची शिफारस करुन तब्बल दीड वर्ष उलटल्यानंतरही राज्यपालांकडून या नावांना अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही. याबाबत सरकारकडून वारंवार राज्यपालांना स्मरण देखील करुन देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही या नावांना राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावर उपाय म्हणून आता सरकारने दोन पावलं मागे येण्याची शक्यता आहे. (Eknath Khadse Latest News Updates)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारने शिफारस केलेल्या काही नावांवर अडचण असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यात काँग्रेसचे सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि प्रा. यशपाल भिंगे, शिवसेनेचे नितीन बानगुडे पाटील अशा काही नावावर राज्यपालांना आक्षेप असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय काँग्रेसकडून शिफारस करण्यात आलेल्या रजनी पाटील राज्यसभेवर गेल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याने त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत.

Sachin Sawant News- Eknath khadse News Updates, Eknath Khadse Latest News Updates
पुणे पोलिसांची दडपशाही? पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बरसवल्या काठ्या

त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकार-राज्यपाल संघर्ष कमी करुन राजकीय पार्श्वभूमी असलेली नाव वगळून सरकार नव्या नावांची यादी पाठवणार असल्याती माहिती मिळत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

Sachin Sawant News- Eknath khadse News Updates, Eknath Khadse Latest News Updates
संजय राठोड - मुख्यमंत्री भेटीवर मोठा खुलासा; मंत्रिमंडळात दिसणार की नाही?

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये साहित्य, कला, क्रीडा व सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्तीची निवड करण्याची अट आहे. मात्र, या चार क्षेत्रात काम करणारी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसावा, असे संकेत आहेत. त्यामुळे आपल्या कोट्यातील आमदारांची शिफारस ही केवळ कोणाची राजकीय सोय किंवा सत्तेतल्या पक्षांकडून या माध्यमातून कोणाचेही राजकीय पुनर्वसन होवू नये याची काळजी राज्यपाल घेत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in