हरिपाठाची एक, टोपेंच्या दोन कोविड लस घ्या ; इंदोरीकर महाराजांकडून जनजागृती

निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivruti Maharaj Indorikar) यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस (corona vaccine) घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे.

हरिपाठाची एक, टोपेंच्या दोन कोविड लस घ्या ; इंदोरीकर महाराजांकडून जनजागृती
Nivruti Maharaj Indorikarsarkarnama

जालना : ''मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही,'' असं सांगत इंदुरीकर महाराजांनी (Nivruti Maharaj Indorikar) नुकतेच कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री राज्यात पूर्ण लसीकरण व्हावं यावर भर देत आहेत. तेथे इंदुरीकर महाराजांच हे वक्तव्य विरोधाभास निर्माण करीत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. पण आता इंदोरीकर महाराजांनी जालन्यातून कोरोना जनजागृतीला सुरुवात केली आहे.

कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Nivruti Maharaj Indorikar) यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस (corona vaccine) घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे. इंदोरीकर महाराजांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केल्यानं टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

''आपण लस घेतली नाही.!आणि घेणार सुद्धा नाही. प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये ! आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन तरी काय करणार? कोरोनावर एकच औषध आहे,ते म्हणजे मन खंबीर ठेवा अस म्हणाऱ्या महाराजांनी इंदोरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या,कोरोना तणावमुक्त करा, अस आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात ही केली.

Nivruti Maharaj Indorikar
काळी मांजरे, कोल्हे, लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालत का?

राज्यात लसीकरनाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या सेलिब्रिटीची मदत घेतली जातीय. त्यात इंदोरीकर महाराजांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोरोनाला हरवण्यात पोलीस, डॉक्टर आणि सामाजिक संस्था यांचं मोठं योगदान आहे, असंही त्यांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलं आहे. महाराष्ट्राचा खरा कोरोना योद्धा राजेश टोपे असून जनतेच्या बाबतीत पोलिस आहे असंही ते म्हणाले. दरम्यान इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे. इंदोरीकर महाराजांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केल्यानं टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in