Nilesh Rane : संजय राऊत मोठा डल्ला मारायला गेले, अन् अडकले..

जीवाला धोका आहे सागंताना लाज वाटली पाहिजे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तरी जीवाला धोका असेल तर पहिले त्यांना राजीनामा द्यायला सांगा. (Nilesh Rane)
Nilesh Rane : संजय राऊत मोठा डल्ला मारायला गेले, अन् अडकले..
Nilesh Rane- Sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मोठा डल्ला मारायला गेले, ईडीला ट्रेल मिळाली, त्यानंतरच ही कारवाई झाली. मनी लाॅन्ड्रींग प्रकरणाची ही केस आहे. (Shivsena) ईडीच्या हाती काही पुरावे लागले असतील म्हणूनच कारवाई झाली असेल. पण नेहमी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होतो असं बोलायची त्यांना सवय लागली आहे. ईडी अशा टुकार लोकांसाठी असे काही करेल असे वाटत नाही, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली.

राऊत हा खूप छोटा माणूस आहे, त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगून ते आपल महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कुणी नेलकटरने पण मारणार नाही, अशी खिल्ली देखील निलेश राणे यांनी उडवली. ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या ८ भूखंड आणि दादर येथील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर राऊत यांनी भाजपवर आरोप करत त्यांना खुले आव्हान देखील दिले आहे.

एका पैशाचा जरी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर माझी सगळी संपत्ती भाजपला देऊन टाकेन. तुमच्या दबावापुढे मी झुकणार नाही, मला धमक्याच काय, जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत लढत राहील, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या आव्हानावर भाजपचे निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत हा खूप छोटा माणूस आहे, आम्ही त्याला महत्व देत नाही, असे सांगत ईडी पुराव्या शिवाय कारवाई करत नाही.

तुम्हाला कारवाई चुकीची वाटत असेल तर तक्रार दाखल करा, एफआयआर नोंदवा आणि कोर्टात जा, असा सल्ला देखील त्यांनी राऊत यांना दिला. निलेश राणे म्हणाले, पैशाचे गैरव्यवहार करण्याची राऊत यांना सवयच आहे, त्यामुळेच त्यांना ५५ लाख रुपये परत करावे लागले होते. आताही मोठा डल्ला मारण्याचा त्याचा प्रयत्न असेल, पण ईडीला माहिती मिळाली आणि ते अडकले. पण नेहमी मिडिया समोर येऊन बोलत राहायचं ही राऊत यांना सवयच आहे.

Nilesh Rane- Sanjay Raut
ईडीने संजय राऊतांवर कारवाई का केली; राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले कारण

राजकीय दबावाचे म्हणाल तर भाजपला आणि ईडीला त्याची काही गरज नाही. एशा छोट्या लोकांसाठी ईडी असे काही करेल असे वाटत नाही. राजकीय दबावाचा आरोप करतांना जेव्हा राणे साहेबांच्या घरावर कारण नसतांना तीन तीन नोटीसा लावल्या ते काय होते? असा सवाल देखील राणे यांनी केला. राऊत यांनी माझ्यावर हिरेन पांड्या प्रमाणे गोळ्या झाडतील, माझा जीव घेतील, असेही म्हटले होते.

यावर राऊत यांना आपले महत्व वाढवून घेण्यासाठी असे बोलण्याची सवयच आहे. राऊत यांना मारायचे तर लांब साधे नेलकटरही कुणी त्यांना मारणार नाही. जीवाला धोका आहे सागंताना लाज वाटली पाहिजे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तरी जीवाला धोका असेल तर पहिले त्यांना राजीनामा द्यायला सांगा, असा टोला देखील निलेश राणे यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in