''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? आज निकाल

हा फोटो समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या निकाहाचा असल्याचे दिसते. याबाबत नवाब मलिकांनी (nawab malik) अधिक तपशील दिलेला नाही.
''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? आज निकाल
sameer wankhede, nawab maliksarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी मध्यरात्री एनसीबीचे (ncb)चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत फोटो शेअर केल्यानं खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरुन मलिकांची वानखेडेंना जाब विचारला आहे. या फोटोबाबत वानखेडे काय उत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

नबाव मलिक यांनी मध्यरात्री टि्वट केलेल्या फोटोत समीर वानखेडे आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या निकाहाचा असल्याचे दिसते. याबाबत नवाब मलिकांनी (nawab malik) अधिक तपशील दिलेला नाही. ''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? असा प्रश्न मलिकांनी टि्वट करुन उपस्थित केला आहे.

नवाब मलिक व एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे कुटूंबीय यांच्यातील वाद दिवाळीच्या अगोदर चांगलाच गाजला होता. या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्यात अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना दिली. सोमवारी (ता. २२) यावर न्यायालय निकाल देणार आहे.

sameer wankhede, nawab malik
राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''

आज न्यायालयाचा निर्णय

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्या. माधव जामदार यांनी निकाल राखून ठेवला आहे. बुधवारी मलिक यांच्या वतीने ॲड. अतुल दामले यांनी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची विनंती न्यायालयात केली. यावर वानखेडे यांच्या वतीने ॲड. अर्शद शेख यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्या. जामदार यांनी दोन्ही पक्षकारांना अतिरिक्त कागदपत्रे देण्यासाठी परवानगी दिली. तसेच, यापुढे आणखी कागदपत्रे सादर करता येणार नाहीत, असेही स्पष्ट केले.सोमवारी (ता. 22) न्यायालय यावर निर्णय जाहीर करणार आहे.

मलिक सतत वानखेडे यांच्याबाबत रोज नवीन खुलासे करत आहेत. यामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद आहे आणि समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे; मात्र हा आरोप आधारहिन आहे. मलिक निराधार आरोप करून आमची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांनी केला असून यापुढे त्यांना कुटुंबाबद्दल काहीही विधान करण्यासाठी मनाई करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in