'त्या' तिघांना भाजप नेत्यांच्या फोनवरुन सोडण्यात आलं ? मलिक यांचा एनसीबीवर 'बॉम्ब'

रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva), प्रतिक गाभा (Pratik Gabha),अमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) यांना एनसीबीने अटक का केली नाही, एनसीबीने त्यांना का सोडलं,' याचा खुलासा समीर वानखेडे यांनी करावा,'' असे मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

'त्या' तिघांना भाजप नेत्यांच्या फोनवरुन सोडण्यात आलं ? मलिक यांचा एनसीबीवर 'बॉम्ब'
Nawab Maliksarakarnama

मुंबई : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला. ड्रग्ज प्रकरणातील रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva), प्रतिक गाभा (Pratik Gabha),अमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) यांना एनसीबीने अटक का केली नाही, एनसीबीने त्यांना का सोडलं. या तीन जणांचे मोबाईल जप्त का केले नाही,' याचा खुलासा वानखेडे यांनी करावा,'' असे मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Nawab Malik
वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी

''या प्रकरणातील आरोपीच्या चैाकशीसाठी समिती नेमण्यात यावी,'' अशी मागणी मलिक यांनी केली. मलिक म्हणाले की रिषभ सचदेवा हे मोहित भारतीय यांचे भाचे आहेत. या तिघांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी फोन केला, याचा खुलासा झाला पाहिजे. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासावे. एनसीबीची कारवाई 'फर्जीवाडा' आहे,

''हि मोठ्या घरातील मुले आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ते एकमेंकांचे मित्र आहे. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केले. माझं काम सत्य समोर आणणं हे आहे. फरार आरोपी के.पी. गोसावी हा या प्रकरणात पंच कसा झाला, असा प्रश्न मलिक यांनी विचारला. ''या प्रकरणात तेराशे जणांची चैाकशी केली . यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी केली आहे.

Nawab Malik
बिल्डर अविनाश भोसले, गोयंका, ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांवर गुन्हा

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. ''जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि लगेच सील केलं जातं. पण ज्या पद्धतीने ड्रग्स असल्याचा दावा करणारे फोटो हे मीडियामध्ये देण्यात आले त्या व्हीडिओ आणि फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. कारण त्या झोनल ऑफिसमध्येच दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.' असा आरोप मलिकांनी केला होता.

Related Stories

No stories found.