राष्ट्रवादी, काॅंग्रेसने जोखीम पत्करायला हवी होती ; सगळं खापर अपक्षांच्या माथी नको..

सरसकट सगळ्या अपक्ष आमदारांना दोषी ठरवता येणार नाही,काहीजणांनी निश्चितच दगाफटका केला, पण काहीजण महाविकास आघाडीसोबत होते. (Bacchu Kadu)
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला, भाजपची रणनिती यशस्वी ठरली आणि त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसतांनाही तिसरा उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. (Vidharbh) राष्ट्रवादी आणि काॅंग्रेने थो़डी रिस्क घ्यायला हवी होती, पण आपले उमदेवार सुरक्षित करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त मते दिली, त्याचा फटका शिवसेनेला बसला. सरसकट सगळ्या अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही, काही अपक्षांनी महाविकास आघाडीला मदत केली आहे, अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर प्रहार केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी, लांबलेली मतमोजणी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने केलेली तक्रार आणि त्यानंतर पहाटे लागलेला धक्कादायक निकाल महाविकास आघाडीला (Maharashtra) धक्का देणारा ठरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनिती, त्यांच्या तंतोतंत केलेली अंमलबजावणी यामुळे भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले.

शिवसेनेच्या संजय पवार यांचा त्यांनी पराभव केला. या पराभवानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी या पराभवावर भाष्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी राष्ट्रवादी व काॅंग्रेस या दोन पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अतिरिक्त मते दिल्यामुळेच महाविकास आघाडीचे गणित फिसकटल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू म्हणाले, शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली म्हणजेच शिवसेनेने जोखीम पत्करली. पण राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना ४२ आणि काॅंग्रेसच्या प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. म्हणजे अनुक्रमे एक आणि दोन मते अतिरिक्त मिळाली. आपले उमेदवार सुरक्षित करण्यासाठी या दोन पक्षांनी हे पाऊल उचलणे गैर नाही, पण महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रिस्क घ्यायला हवी होती, पण तसे झाले नाही.

शिवाय अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही, त्याचा फटका, शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे बाद झालेले मत आणि काही अपेक्षांनी केलेला दगाफटका हाच शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. सरसकट सगळ्या अपक्ष आमदारांना दोषी ठरवता येणार नाही,काहीजणांनी निश्चितच दगाफटका केला, पण काहीजण महाविकास आघाडीसोबत होते हे देखील नाकारता येणार नाही.

Bacchu Kadu
Beed : ताकद दाखवली, तर पक्षाला पंकजा मुंडेंची दखल घ्यावीच लागेल..

नवाब मलिक, अनिल देशमुख विधानसभेचे सदस्य असतांना न्यायालयाने त्यांना मतदानाला परवानगी दिली नाही, हा निर्णय म्हणजे संशोधनाचा विषय असल्याची टीका देखील बच्चू कडू यांनी केली. या शिवाय भाजपने ईडीचा दबाव टाकून काही अपक्ष आमदार, आघाडीच्या नेत्यांना मदत करायला भाग पाडले, असा आरोप देखील कडू यांनी केला. रा

ज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाल्यानंतर शरद पवारांनी फडणवीसांचे कौतुक केले, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, समुद्राच्या पाण्याची खोली मोजता येते पण शरद पवारांच्या मनात काय चालले हे गेल्या ५० वर्षात कुणाला ओळखता आलेले नाही. त्यामुळे त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले यामागे काय राजकारण आहे, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com