परमबीर सिंहांना शिक्षा होणारच ; सरकार न्यायालयीन लढाई लढणार

देशमुखांना सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली. परंतु अजूनही वाझे, सीबीआय, परमबीर सिंह यांच्याकडून कोणताही पुरवा देण्यात आला नाही.
nawab malik, parambir singh
nawab malik, parambir singhsarkarnama

मुंबई : मे महिन्यापासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह गुरुवारी गुन्हे शाखेत हजर झाले. ''परमबीर सिंह हे फरार घोषित आहेत. परमबीर सिंह यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा होणारच,'' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

परमबीर सिंह (parambir singh) हे फरार घोषित आहेत. त्यांच्याविरोधात राज्य सरकार आणि मुंबई पोलीस न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले, ''परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला अन् तेच फरार होते. कायदेशीर लढाई लढत आहेत. पण आरोप करणारे परमबीर सिंह हे मे महिन्यापासून फरार होते.

त्यांच्याविरोधात ४ गुन्हे खंडणीचे दाखल आहेत आणि एक आपल्या ज्युनियर अधिकार्‍यांच्या छळाचा गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना फरार घोषित केल्यानंतर ते परतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सांगितले, आपल्याला मुंबई पोलिसांपासून धोका आहे, हे आश्चर्यकारक आहे. तिथे त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. पण परमबीर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल,''

''देशमुखांना सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली. परंतु अजूनही वाझे, सीबीआय, परमबीर सिंह यांच्याकडून कोणताही पुरवा देण्यात आला नाही. राजकीय हेतुने ही कारवाई झाली आहे. निश्चितरुपाने देशमुख न्यायालयीन लढा लढणार आहेत,'' असे नवाब मलिक यांनी सांगितले.

nawab malik, parambir singh
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुरुवारी टि्वट करीत नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी याबाबतचे पुरावे आपल्या ट्विटमध्ये जोडली आहेत. नवाब मलिकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आणखी एक फर्जीवाडा, अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी.

नवाब मलिक म्हणाले, ''समीर वानखेंडेंनी बनावट दाखल्यांचा आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र घेतले आणि नोकरी मिळवली. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ओशिवरा दफनभूमीत दफन करण्यात आले, तिथे आईच्या धर्माचा उल्लेख १४ एप्रिल २०१५ रोजी मुस्लिम लिहिले आहे. दुसर्‍या दिवशी महापालिकेत मृत्यूची नोंद करताना हिंदु अशी केली. आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी आईबाबत असा बोगसपणा केला आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com