शिव्याच नाही तर मोदींना मारूही शकतो : नाना पटोले झालेत बेफाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा भाजपचा आरोप
Nana Patole
Nana Patolesarkarnama

भंडारा : राजकारणात आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. मागे एकदा त्यांना ‘दादा’पेक्षा ‘नाना’ मोठा, असे म्हणून खळबळ उडवून दिली होती. तर ’राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव दुकान बंद पडेल’, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचाही रोष ओढवून घेतला होती. आता चक्क मी ‘मोदी यांना शिव्याही देऊ शकतो, अन् मारूही शकतो’, असे म्हणत देशभरात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.

Nana Patole
तीन मंत्री आणि चौदा आमदारांनी राजीनामे देताच मोदी अॅक्शन मोडवर..

देशात खळबळ उडाल्यानंतर नानांच्या या वक्तव्यावर क्रिया-प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर ‘मी गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत होतो’, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न नानांनी केला खरा. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होईल, असे दिसत नाही. कारण ज्या जेवनाळा या गावात ‘त्या’ नावाचा कुणीही गुंड नाही, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. आपण केलेल्या वक्व्यांचे बेधडकपणे समर्थन करणारे नाना यावेळी मात्र काल केलेल्या आपल्या व्यक्तव्यावरून माघार घेताना दिसत आहेत. आता ते उठलेले वादळ कशा प्रकारे शमवणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

साकोली विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधात प्रचाराला आले होते. त्याचा राग ते अजूनही मनात धरून असल्याचे बोलले जात आहे. भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे दादागिरी करणारे वक्तव्य केले आहे.

लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर नाना पटोले हे ऑक्टोबर २०१९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींवर वक्तव्य करीत आहे. रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नाना पटोले यांनी आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी यांना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. मात्र, एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही, अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

Nana Patole
लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक नाही; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

मोदी सरकार लोकांना मारायला लागले

भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे. तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे वक्तव्यही नाना पटोले यांनी यावेळी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com