अंदाज खरा ठरला! काँग्रेस फडणवीसांच्या मनधरणीला जाणार..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
Nana Patole, Devendra Fadnavis And Balasaheb Thotrat
Nana Patole, Devendra Fadnavis And Balasaheb ThotratSarkarnama

पुणे : महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर काँग्रेसने (Congress) दिवंगत खासदार राजीव सातव (Raveev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपकडून या जागेवरुन औरंगाबाद भाजप (BJP) अध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांना रिंगणात उतरवलं आहे. केणेकर यांनी काल विधानभवनात उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

या निवडणूकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर अर्ज भरण्याची मुदत आहे तर उद्या म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी अर्जाची छानणी होणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

मात्र निधनानंतर जाहीर झालेल्या जागांवरील पोटनिवडणूका या बिनविरोध करण्याचे संकेत असतात. त्या संकेतांना धरुनच मतदान टाळून हि निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करणार असून त्यासाठी विरोधी पक्षाशी चर्चाही करणार असल्याचे काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. मात्र पटोले यांच्या याच वक्तव्यामुळे 'सरकारनामा'चा अंदाज खरा ठरला आहे.

काँग्रेसला पुन्हा देवेंद्र फडणवीसांची मनधरणी करावी लागणार

निधनानंतर जाहीर झालेल्या जागांवरील पोटनिवडणुका या बिनविरोध करण्याचे संकेत असतात. मात्र नुकत्याच झालेल्या राज्यसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. सोबत अखेरच्या काही दिवसापर्यंत हा अर्ज माघारी न घेण्यावर भाजपचे नेते ठाम होते. मात्र त्यानंतर मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता.

Nana Patole, Devendra Fadnavis And Balasaheb Thotrat
काँग्रेसला पुन्हा फडणवीसांची मनधरणी करावी लागणार?

त्यानंतर आताही भाजपने प्रज्ञा सातव यांच्याविरोधात भाजपने संजय केणेकर यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळेच सरकरानाचा एक अंदाज खरा ठरला आहे. जर भाजपने उमेदवार दिला तर काँग्रेसला देवेंद्र फडणवीसांची मनधरणी करावी लागू शकते असा अंदाज 'सरकारनामा'ने ३१ ऑक्टोबरच्या वृत्तामध्ये वर्तवला होता. त्यानुसार आता स्वतः नाना पटोले यांनी नुकतेच म्हटले आहे की, सातव यांची बिनविरोध निवड व्हावी म्हणून आपण विरोधकांशी बोलणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com