राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल...

बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीकडून सिंदखेड राजा इथून राजेंद्र शिंगणे निवडून आले आहेत.
Sharad Pawar-Nana Patole
Sharad Pawar-Nana PatoleSarkarnama

बुलढाणा : महाविकास आघाडी सरकार म्हणून जरी एकत्र काम करत असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील कुरबूरी वरचेवर दिसून येतात. बुलढाण्यामध्ये आजही याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल असं म्हणतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच मित्रपक्षाला पुन्हा डिवचले आहे.

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीचे सगळे महान नेते असून पंढरपूरमध्ये हरले. आज राष्ट्रवादीचे तिकीट घेवून त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलढाण्यातील दुकान बंद व्हायला वेळ लागतो किती. एकच तर दुकान आहे बुलढाण्यामध्ये, ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही.

Sharad Pawar-Nana Patole
आमच्याच मित्रपक्षातील लोकांनी घेतली कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी...

नाना पटोले यांना पुन्हा या वक्तव्याबाबत खुलासा विचारला असता ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भात दुकान नाही, हे अनेकदा विदर्भातील जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे दुकान आहे, असे म्हणणे पण चुकीचे होईल, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीकडून सिंदखेड राजा इथून राजेंद्र शिंगणे निवडून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com