Patole Vs Fadnavis :'' निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांकडून जुनी पेन्शन योजनेबाबत..''; पटोलेंचा आरोप

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याची धमक फक्त आमच्यातच...
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole On Old Pension Scheme : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान औरंगाबादच्या शिक्षक मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल आम्ही नकारात्मक नाही असं विधान केलं होतं. आता फडणवीसांच्या याच विधानावर त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.

नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना देवेद्र फडणवीसांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाष्य केलं आहे. पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी काहीही बोलत असतात. आता फडणवीसांकडून निवडणुकीच्या तोंडावरती जुनी पेन्शन योजनेसंदर्भात भुलभुलैय्या दाखवायचा प्रयत्न करत आहेत. गेली नऊ वर्षे त्यांनी का प्रयत्न केले नाही, याचं उत्तर त्यांच्याकडं नाही अशी टीकाही नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे.

Nana Patole
Maharashtra Politics : मध्यावधी निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल का ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिक्षकांच्या प्रमुख मागणी असलेल्या जुनी पेंशन योजनेबाबत आपण नकारात्मक नसल्याचं स्पष्टोक्ती दिली आहे. दरम्यान, जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केला आहे.

पण जर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केली तर 8 वर्षात अडीच लाख कोटींचा भार सरकारी तिजोरीवर पडेल आणि त्यासाठी काही वेगळा विचार करावा लागेल असेही फडणवीस म्हणाले. यावेळी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याची धमक फक्त आमच्यातच असल्याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला होता.

अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, अहमदनगर काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केलेली आहे.जिल्हाध्यक्षाने स्वतःहून राजीनामा दिलेला नाही. तर आम्ही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. कारण त्यांनी बंडखोर सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे.

Nana Patole
Nana Patole News : भाजपचा कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पटोलेंनी धुडकावला; म्हणाले...

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत अखेर युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीत आंबेडकरांना सामील करण्यावरुन मतभेद असल्याचीही चर्चा आहे.

याचदरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्याकडे अजून आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com