Mumbai : शिवसेनेच्या सर्व खासदारांना उद्या मुंबईत हजर राहण्याचे ठाकरेंचे आदेश..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या सगळ्या परिस्थितीला आणि विरोधकांच्या हल्याला तितक्याच नेटाने परतवून लावण्याची आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. (Cm Uddhav Thackeray)
Mumbai : शिवसेनेच्या सर्व खासदारांना उद्या मुंबईत हजर राहण्याचे ठाकरेंचे आदेश..
Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून पेटवलेले वातावरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची राज्याला केलेली सूचना, राणा, सोमय्या प्रकरण या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना उद्या (ता.२९) रोजी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

१ मे रोजी राज ठाकरे यांची औंरगाबादेत तर उद्धव ठाकरे यांची पुण्यात सभा होत आहे. या सगळ्या घडामोडी पाहता खासदारांच्या उद्याच्या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra) खासदारांसोबत स्नेहभोजन आणि राज्य व देश पातळीवर घ्यावयाची भूमिका या संदर्भात ठाकरे खासदारांना मार्गदर्श करण्याची शक्यता आहे. मातोश्री किंवा वर्षा या शासकीय निवासस्थानी ठाकरे खासदारांशी चर्चा करणार आहेत.

हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे, सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला, त्यावरून विरोधकांकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात थोपटलेले दंड या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या सगळ्या परिस्थितीला आणि विरोधकांच्या हल्याला तितक्याच नेटाने परतवून लावण्याची आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते.

Cm Uddhav Thackeray
MNS : `राजसभे`ला थेट अयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते येणार..

मला एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेच्या दिवशीच म्हणजे १ मे महाराष्ट्र दिनी पुण्यात सभा घेण्याची घोषणा केली. दुसरीकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये घट करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी सूचना ठाकरे यांना केली होती. त्यानंतर केंद्राकडे थकित असलेल्या जीएसटीचा परतावा आधी परत करा, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली.

यावरूनही भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ही सगळी पार्श्वभूमी पाहता केंद्रात व राज्यात खासदारांनी भाजपच्या विरोधात अधिक आक्रमक होत इंधन दरवाढीला मोदी सरकारच कसे जबाबदार आहे, हे ठणकावून सांगावे, अशा सूचना खासदारांना दिल्या जाऊ शकतात. या शिवाय राज्यात महाविकास आघाडी असली तरी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी भविष्यात काय रणनिती आखली जावी, यासह अनेक मुद्यावर ऊहापोह होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.