Shrikant Shinde On Ajit Pawar: ''ज्यांच्यावर 'काका मला वाचवा' म्हणण्याची वेळ, ते...''; खासदार शिंदेंचा अजितदादांवर पलटवार

NCP Vs Shivsena : ...पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली.
Shrikant Shinde On Ajit Pawar
Shrikant Shinde On Ajit PawarSarkarnama

Shrikant Shinde News : काहीही झालं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावी येऊन दोन तीन दिवस राहतात. काय करतात तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. तेथे त्यांना कर्नाटकात कोण ओळखणार आहे अशी बोचरी टीकाही पवारांनी केली होती. यावर आता शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी(दि.९) नागपुरात पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारां(Ajit Pawar)च्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहेत. शिंदे म्हणाले, आता ज्यांच्यावर 'काका मला वाचवा 'असं म्हणण्याची वेळ आली आहे आणि हे आम्हांला शिकवणार अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले

Shrikant Shinde On Ajit Pawar
Vaibhav Thorat Joins Shinde Group: भ्रष्टाचाराचा आरोप असलेले वैभव थोरात शिंदे गटात; आता मनसेची भूमिका काय?

शिंदे नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीकेवर पलटवार करताना श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde), म्हणाले, ज्यांनी स्वत:ची ओळख काकांच्या नावानं प्रस्थापित केली, त्यांनी शिंदेंना कोण ओळखतं असं बोलू नये. पाच सहा दिवसांपूर्वी त्यांना वाटलं की, आता मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. तसेच ते वागत होते. पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली. आता ‘काका मला वाचवा’असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार असा चिमटा शिंदेंनी अजित पवारांना काढला.

'सारा शहर अब...'

बॅनर लावल्याने कुणी भावी मुख्यमंत्री होत नाही. यांनी पहाटेचा प्रयत्न केला पण जमले नाही. यांना ते जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी करून दाखवलं. याचं शल्य त्यांना आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न केला पण पुन्हा काकांनी हवा काढून घेतली. आज तुम्ही दुसऱ्या राज्यात जावून पहा, तुम्हाला किती लोक ओळखतात असा सवाल करत 'सारा शहर अब मुझे काका के नाम से जानता है' असा डायलॉग मारत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता.

Shrikant Shinde On Ajit Pawar
Pradeep Kurulkar case : मोठी बातमी! ' डॉ.कुरुलकरांनंतर अन्य एक अधिकारी 'हनीट्रॅप'मध्ये; 'ATS'च्या हाती महत्वाचे धागेदोरे...

...हा तर ठाकरेंचा विश्वविक्रम

खासदार शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. शिंदे म्हणाले, गेली अडीच वर्षे वर्षा बंगल्याची दारे बंद होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्वसामान्यांना कवायत करावी लागत असत. आज वर्षाची दारे २४ तास खुली आहेत. यांनी तर अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विश्वविक्रम असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com