बंद मोडण्याची भाषा करणारे मूर्ख ; राऊतांचा घणाघात

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp Sanjay Raut) यांनी लगावला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.


बंद मोडण्याची भाषा करणारे मूर्ख ; राऊतांचा घणाघात
mp Sanjay Rautsarkarnama

मुंबई : ''महाराष्ट्रात बंद सुरू झालेला आहे, या महाराष्ट्र बंदकडे (maharashtra bandh) देशाचा समस्त शेतकरी फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र भाजपने या बंदला विरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं आहे. मात्र बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp Sanjay Raut) यांनी लगावला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध (lakhimpur violence) आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ''लोकांचा शेतकऱ्यांच्या संदर्भातला संताप समजून घेतला पाहिजे, जर कोणी म्हणत असेल की आमचा बंदला पाठिंबा नाही अशी राजकीय विधान कोणी करत असेल तर त्याने आपण स्वतःला या देशाचे खरंच नागरिक आहोत का आपण या शेतकऱ्यांचं देणे लागतोय का असा प्रश्न विचारला पाहिजे,'' असे राऊत म्हणाले.

mp Sanjay Raut
ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल ; शेलारांचे टीकास्त्र

''हा बंद मोडून काढला पाहिजे, असं जर कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. जर कोणी म्हणत असेल तर आम्ही रस्त्यावर येऊ तर त्यांनी उतरून दाखवा. गतिरोधक असता तर लखीमपूर येथे ज्या जीपने भाजपच्या मंत्री पुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं ती जीप थांबली असती. या सरकारला गतिरोधक नाही म्हणून ती बेफाम आणि बेबंद पळत सुटली आहे. कुठे स्वतःच्या गाड्या खाली, तर कुठे महागाई डिझेल आणि पेट्रोलच्या भाव वाढीमध्ये गरीब सामान्य शेतकऱ्यांना हे सरकार चिरडत सुटले आहेत,'' असा आरोप संजय राऊतांनी केला आहे,

राऊत म्हणाले, ''लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे.''

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना (shivsena) आक्रमक झाली आहे. सकाळीचं रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Related Stories

No stories found.