तीन हजारहून अधिक एसटी संपकरी निलंबित

एसटी महामंडळाचा कारवाईचा बडगा सुरुच
ST Strike
ST Strike Sarkarnama

मुंबई : राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) एसटी संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी एसटी कामगारांना भरगोस पगारवाढ दिली. गेल्या चाळीस वर्षातील ही सर्वात मोठी पगारवाढ असल्याचे सरकारने सांगितले. मात्र अद्यापही काही ठिकाणी एसटी कामगार संपावर ठाम आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कामगारांना सेवेत रुजू होण्याचे आदेश देऊनही राज्यातील अनेक ठिकाणी कामगारांनी संप सुरुच ठेवला आहे. या सर्व आंदोलकांवर राज्यसरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे

- रायगडमध्ये 24 संपकरी कामगारांची सेवा समाप्त

रायगडमध्ये (Raigadh) जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कामावर रुजू न होणाऱ्या 24 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 70 जणांचे निलंबन करण्यात आले असून 103 जणांना नोटिसा पाठण्यात आल्या आहेत. तर आजपर्यंत 900 कर्मचारी कामावर हजर झाले असून गेल्या 4 दिवसात एसटीत्या 160 फेऱ्या झाल्या आहेत.

ST Strike
'सर्व निवडणुका एकहाती जिंकणार'; भाजप नेत्याचा कोकणात दावा

- नांदेड - एसटीचे 232 कर्मचारी निलंबित

राज्य सरकारने केलेली पगार वाढ मान्य नाही, विलीनीकरणच करा असा आग्रह धरलेल्या 232 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. कर्मचारी ऐकत नसतील तर कारवाई तीव्र कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 आगारात तीन हजार चालक, वाहक, कर्मचारी कार्यरत आहेत. 22 दिवसांपासून संप सुरु असल्याने 450 बसेसची चाके थांबलेली आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांची नुकसान तर होत आहे.

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या नांदेड (Nanded) विभागातील 232 कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. राज्यात काही ठिकाणी एसटी चालू झाल्या आहेत. त्यामुळे हा संप मोडीत काढण्यासाठी आता एसटी महामंडळाने देखील कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

- लातूरमध्ये 186 संपकऱ्यांचे निलंबन

लातूर (Latur) जिल्ह्यातही एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. संपावर ठाम असणाऱ्या जिल्ह्यातील 186 कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केलं आहे. उच्च न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असून कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सुध्दा कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.

शनिवारी (27 नोव्हेंबर) 116 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यापूर्वी 70 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 186 झाली आहे. तुटेपर्यत ताणू नये, असं म्हणत एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचेआवाहन एसटीचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी केले आहे.

दरम्यान, शनिवार (27 नोव्हेंबर) पर्यंत राज्यभरात एकूण 3010 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कालपर्यंत एकूण निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा 6277 झाला आहे. तर काल 270 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यानंतर सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1496 वर पोहचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in