MNS : पीएफआयवर बंदी घातल्याने राज ठाकरे खूष ; अमित शहांचे केले अभिनंदन..

पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. (Raj Thackeray)
MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, Mumbai
MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, MumbaiSarkarnama

मुंबई : पीएफआय अर्थात पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया या दहशतावादी कारवायांशी संबंध असलेल्या देशविघातक व देशद्रोही संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) खूष झाले आहेत. त्यांनी पीएफआय वरील बंदीचे स्वागत करतांना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांचे अभिनंदन देखील केले आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला. (MNS) राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पीएफआय ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांचं अभिनंदन.

पीएफआयकडून देशात घातपात, दहशतवाद पसरवण्यात येत असल्याची माहिती केंद्राच्या तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने वेगवान हालचाली करत केंद्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी धाडसत्र सुरू केले. यातून पीएफआय व त्यांच्या संघटनेशी संबंधित शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या धडक कारवाईमुळे पीएफआयचे धाबे चांगलेच दणाणले.

पण या कारवाईनंतर विशेषतः महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या विरोधात मुस्लीम संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. पुण्यातील आंदोलनात तर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत, पाकिस्तान जिदांबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली.

MNS Leader Raj Thackeray- Home Minister Amit Saha News, Mumbai
Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला साडेतीनशे बसेसमधून २५ हजार शिवसैनिक नेणार..

औरंगाबादेत तर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट पीएफआयच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या वेगवान घडामोडीनंतर देशात एकच चर्चा सुरू झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या धडाकेबाज कारवाई आणि पीएफआयच्या बंदीच्या निर्णयाने खूष झाले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. तसेच अशा देशविघात, देशद्रोही कीड वेळोवेळी नष्ट करावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com