कोल्हापूरमध्ये ठरलं! पुन्हा सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक तर धुळ्यातून अमरीश पटेल

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाडिक आणि पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले.
कोल्हापूरमध्ये ठरलं! पुन्हा सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक तर धुळ्यातून अमरीश पटेल
Satej Patil Vs Amal Mahadik Sarkarnama

कोल्हापूर : विधानपरिषदेसाठीच्या सहा जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणूकांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची उमेदवारी निश्चिती सुरु आहे. अशात आता भाजपने दोन जागांवरील उमेदवार अंतिम केले आहेत. भाजपकडून कोल्हापूरमधून माजी आमदार अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

तर धुळ्यातून अमरीश पटेल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाडिक आणि पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले. दिल्लीतून पुढच्या दोन दिवसांमध्ये या दोघांच्याही नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

अमल महाडिक यांच्या घोषणेमुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा सतेज विरुद्ध अमल महाडिक असा सामना रंगणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजप तगडा उमेदवार कोण देणार? याकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीला अमल महाडिक यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांची नावं आघाडीवर होती. मात्र अखेरीस सतेज पाटील यांच्याविरुद्ध अमल महाडिक यांनाच रिंगणात उतरवण्यात आले आहे.

Satej Patil Vs Amal Mahadik
सतेज पाटलांनी गडहिंग्लज गाठले... पण श्रीपतराव शिंदेंनी शब्द नाही दिला!

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी अवघ्या २२ दिवसांत प्रचार करून परावभ केला होता. पण त्यानंतर पुढच्या वर्षभरात म्हणजे २०१५ मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडिल व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांना आस्मान दाखवले होते. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सतेज पाटील यांनी आपल्या पुतण्या ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांच्या विरुद्ध रिंगणात उतरवून पराभवाचा दणका दिला होता.

Satej Patil Vs Amal Mahadik
प्रकाश आवाडेंनी भाजपला पाठिंबा देताच सतेज पाटील कल्लाप्पाण्णांच्या भेटीला!

आता सतेज पाटील यांच्याकडे मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. सोबतच राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. त्यांचे गोकुळसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हि निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार होणार यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in