‘कौन बनेगा करोडपती’चा 'अंनिस'कडून निषेध ; दिलगिरी व्यक्त करा

पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे, त्यामुळे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी दाभोळकर (mukta dabholkar) यांनी केली आहे.
amitabh bachchan,mukta dabholkar
amitabh bachchan,mukta dabholkarsarkarnama

नांदेड : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दाखवलेल्या एका प्रयोगाबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. ''कौन बनेगा करोडपती'' कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन (mid brain activation) कोर्स प्रमोशन केल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता दाभोळकर यांनी केलाा आहे.

यात पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे, त्यामुळे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी दाभोळकर (mukta dabholkar) यांनी केली आहे.

नांदेड येथे पत्रकार परिषदेत मुक्ता दाभोळकर बोलत होत्या. मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन हा बुवाबाजीसारखाच प्रकार आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. तसंच हा फक्त फसवणुकीचा व्यवसाय आहे असा दावा मुक्ता दाभोळकर यांनी केला आहे. 'कौन बनेगा करोडपती’मध्ये दाखवलेला प्रयोग चुकीचा होता, असं जाहीर करावं, असे मुक्ता दाभोळकर म्हणाल्या.

amitabh bachchan,mukta dabholkar
कोट्यावधींचा मलिदा गेल्याने कोल्हापुरात मतदारांचे हुंदके!

''कार्यक्रमामध्ये १५ किंवा १६ तारखेला दाखवण्यात आलेली अंधश्रद्धेवर आधारित एक क्लिप आमच्या निदर्शनास आली आहे. डोळे बंद करून वाचन करावे, काळा चष्मा घालून वाचन करावे, अशा विविध प्रकारचे प्रयोग करून अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये झाला आहे. तरी या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.” शिवाय, अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी जेणेकरून अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार नाही,'' अशी मागणी दाभोळकरांनी केली आहे.

''डोळ्यांशिवाय वाचता येणं निव्वळ अशक्य आहे. जे दाखवलं जातं तो आंधळी कोशींबीर या खेळाचा सफाईदार प्रकार आहे. पट्टीच्या आडून खाली पाहून वाचलं जातं. मिड ब्रेन अॅक्टिव्हेट न झालेली व्यक्तीही हे सफाईने करू शकते. त्यामुळे या प्रलोभनांना कुणीही बळी पडू नये. हे गैर प्रकार थांबवले पाहिजे,'' अशीही मागणी मुक्ता यांनी केली आहे. मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, ''अमिताभ बच्चन हे एक मोठं नाव आहे. कोट्यवधी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांनी अशा चुकीच्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये,''

''उजवा आणि डाव्या बाजूचा मेंदू अॅक्टीव्ह केला की अद्भूतशक्ती जागृत होते असा दावा केला जातो. आणि मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन या कोर्ससाठी मोठ्या प्रमाणात फी उकळली जाते. मात्र प्रत्यक्षात हा सगळा बुवाबाजी आणि भोंदूगिरीसारखाच प्रकार आहे. मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन असा काही प्रकार नसतो. दावा करणारे लोक हा दावा करतात की मिड ब्रेन अॅक्टिव्ह झालेली व्यक्ती डोळ्यांवर पट्टी बांधून वाचू शकते. हा दावा धांदात खोटा आहे,'' असे दाभोळकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com