mhada exam 2021 : आव्हाड म्हणाले, ''वेळ आली तर परीक्षा रद्द करणार''

''विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे.आपण दिलेले पैसे वाया जातील,'' असे आव्हाड यांनी सांगितले.
jitendra awhad
jitendra awhadsarkarnama

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईकडून विविध पदांच्या (mhada exam 2021)भरती प्रक्रिया सुरु आहे. कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

१२ डिसेंबरपासून म्हाडाच्या परीक्षा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ''कृपया अफवांना बळी पडू नका.अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा पार पडणार असून यात गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल,'' असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

''या परीक्षेबाबत राज्यात अफवा पसरविल्या जात आहेत. असा गैरप्रकार करणाऱ्या कोणी पकडून दिले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पास झालेल्यांची दुसरी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आपण दिलेले पैसे वाया जातील,'' असे आव्हाड यांनी सांगितले. त्यांनी यााबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

jitendra awhad
बारा आमदारांच्या निलंबनावरील सुनावणी पुढे ढकलली

''नाशिक, आष्टी, अकोला येथे काही जण पैसे घेत असल्याची तक्रारी येत आहेत. अशा फसवणुकीला बळी पडू नका. कुठलाही वशिला या परीक्षांमध्ये चालणार नाही. गृहनिर्माण विभाग असे प्रकार चालू देणार नाहीत. पारदर्शक पद्धतीनं ही पदे भरली जाणार आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं याचा फायदा घेऊन पैसे घेत असतील तर विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती त्यांच्या नादाला लागू नका, कारण वेळ आली तर ही परीक्षा मी रद्द करेल,'' असे आव्हाड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in