जिल्हा परिषद गट, गणांबाबत उत्सुकता ; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

मागील पंचवार्षिक निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आरपीआय (डेमोक्रॅटीक) पक्षांनी स्वबळावर लढवली होती. ( Aurangabad Z.P.)
Aurangabad Z.P.
Aurangabad Z.P.Sarkarnama

औरंगाबाद : जिल्हा परिषदेची निवडणूक होणार की नाही, याबाबत स्पष्टता नसली तरीही निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यलयाने गट, गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. (Aurangabad) यात जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समित्यांसाठी एकुण १४० गण निश्चित केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान गट निश्चिती झाली तरी आरक्षणाचे काय? कोणते गाव कोणत्या गट अथवा गणाला जोडले याची पारावर चर्चा रंगू लागली आहे. (Shivsena) तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या बड्या पक्षासह इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्कलमध्ये मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. (Congress) आगामी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप आराखडे निवडणूक (Bjp) आयोगाकडे सादर केल्यानंतर गट आणि गणांबाबत संभाव्य उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

भावी सभापती, भावी जिल्हा परिषद सदस्यांचे समर्थक आपापल्या परीने आराखडे बांधू लागले आहेत. गट आणि गणाची खातरजमा करून प्रतिनिधींना, अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाशी संपर्क साधत आहे. तर गाव पातळीवरील ग्रामपंचायतींच्या नंतर मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषद गटावर अनेक मातब्बर मंडळींच्या नजरा आहेत. मानाचे पद असलेल्या या पदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या पाच वर्षापासून झटून काम करणाऱ्या तरूण मंडळीची धाकधुक देखील वाढली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आरपीआय (डेमोक्रॅटीक) पक्षांनी स्वबळावर लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जिल्हा परिषदेत राजकीय दृष्ट्या पैठण, खुलताबाद तालुका हा भाजपच्या ताब्यात आहे. तर औरंगाबाद -कॉंग्रेस, पैठण शिवसेनेच्या ताब्यात आहे.

गंगापुर-सिल्लोड तालुक्यात शिवसेना-भाजपचे सदस्य आहेत. व इतर तालुक्यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सगळ्याच पक्षातील सदस्य आहेत. दरम्यान आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना आघाडी म्हणून निवडणूक लढवणार की स्वतंत्र या बाबतचे धोरण स्थानिक पातळीवर ठरवले जाणार आहे. भाजप मात्र स्वबळावर लढणार असे दिसते.

Aurangabad Z.P.
IPL:अंडर १९ मधील कामगिरीने उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरची धोनीच्या संघात एन्ट्री

सध्या जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आहे. अध्यक्षपद काॅंग्रेसच्या मीना शेळके तर उपाध्यक्ष पद भाजपच्या एल.जी.गायकवाड यांच्याकडे आहे. सभापती पदामध्ये शिवसेनेच्या वाट्याला तीन तर एक भाजपकडे आहे. राष्ट्रवादीचे तीन सदस्य असल्याने येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाला जोर लावावा लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप- २३

शिवसेना-१७

कॉंग्रेस-१५

राष्ट्रवादी कॉंग्रेस-३

मनसे-१

आरपीआय (डे.)-१

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in