रुईकर कुटुंबाच्या मदतीला युवासेनाही धावली; दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

युवासेनेचे कोषाध्यक्ष नगरसेवक अंकित प्रभू यांनी मराठाड्यातील पदाधिकाऱ्यांसह रुईकर कुटुंबाची आज भेट घेतली. (Yuvasena)
Yuvasena Help Ruikar Family In Beed

Yuvasena Help Ruikar Family In Beed

Sarkarnama

बीड ः एकनिष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शिवसेना (Shivsena) त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे. (Beed) आतापर्यंत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या वतीने या कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्यात आली असून पक्के घर आणि कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे. रुईकर कुटुबांच्या मदतीला आता युवासेना (Yuvasena) देखील धावली आहे.

राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशानूसार युवासेनेचे कोषाध्यक्ष नगरसेवक अंकित प्रभू यांनी मराठाड्यातील पदाधिकाऱ्यांसह रुईकर कुटुंबाची आज भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांना दिलासा देत त्यांनी सुमंत रूईकर यांच्या दोन्ही मुलांच्या संपुर्ण शिक्षणाची जबाबदारी युवासेना उचलेल असा शब्द आदित्य ठाकरे यांच्या वतीने दिला.

उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, विस्तारक राहूल लोंढे अभिमन्यू खोतकर, विपुल पिंगळे हे देखील यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हे साकडे घालण्यासाठी बीड ते तिरुपती पायी निघालेल्या सुमंत रुईकर या कट्टर शिवसैनिकांचा दुर्दैवी अंत झाला.

त्यांच्या पश्चात रुईकर कुटुंबाची आबाळ होऊ नये, त्यांना आधार मिळावा यासाठी शिवसेनेने तातडीने रुईकर कुटुंबाची जबादारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बीड जिल्ह्याची संघटनात्मक जबादारी असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते रुईकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना रोख पाच लाखांची मदत देण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Yuvasena Help Ruikar Family In Beed</p></div>
Fadanvis: मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहे ; पंकजा, प्रितमचेही अभिनंदन..

त्यानंतर राज्याचे नगरविकामंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रुईकर कुटुंबियांना आधार देत स्वतःकडून पाच लाखांची मदत पाठवली. सुमंत रुईकर हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक शिवसैनिक होते, त्यांच्या कुटुंबामागे शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे. या कुटुंबाला पक्के घर, मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी देखील शिवसेनेने स्वीकारली आहे.

रुईकरांचा मृत्यू हा शिवसेना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला होता. शिवसेनेपाठोपाठ आता युवासेना देखील रुईकरांच्या कुटुंबासाठी धावली असून आदित्य ठाकरे यांनी देखील या कुटुंबाबद्दल काळजी व्यक्त करत सर्वोत्तपरी मदतीची तयारी दर्शवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com