'आपले स्वातंत्र्य हे कंगनाला मिळालेल्या स्वातंत्र्याइतके स्वस्त नाही'

भाजप (BJP) आपल्या पाळलेल्या पोपटांना अशी विधाने करायला लाऊन देशात (Country) ध्रुवीकरण करू पाहत आहे,
'आपले स्वातंत्र्य हे कंगनाला मिळालेल्या स्वातंत्र्याइतके स्वस्त नाही'

बीड : देशभरातील हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या (Freedom Fighter) बलिदान दिले, लढा दिला, अनेकांनी फासावर चढून देशाला ब्रिटीशांच्या गुलामगुरीतून मुक्त केले. पण भाजप आपल्या पाळलेल्या पोपटांना अशी विधाने करायला लाऊन देशात ध्रुवीकरण करू पाहत आहे, अशी टीका काँग्रेसच्या (Congress) हिमाचल (Himachal) व जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) प्रभारी व राज्यसभा सदस्या रजनी पाटील (Rajani Patil) यांनी केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranout) हिने गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना, भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे विधान केले. त्यानंतर देशभरातून तिच्यावर टीकेचा वर्षाव सुरु आहे. यावर रजनी पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

'आपले स्वातंत्र्य हे कंगनाला मिळालेल्या स्वातंत्र्याइतके स्वस्त नाही'
विधान परिषद : भाजपकडून बावनकुळे, महाडिक; पण चित्रा वाघांना संधी नाही

एका अभिनेत्रीने २०१४ साली खरे स्वातंत्र्य मिळाले असे विधान करून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या स्वातंत्र्याऐवढे एवढे आपले स्वातंत्र्य स्वस्त नाही. असा टोलाही रजनी पाटील यांनी कंगनाला लगावला. १९४७ साली भीक मागून स्वातंत्र्य मिळाल्याचे विधान ऐकल्यावर मन सुन्न होते. असे म्हणणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही विरोधकांनी चेष्टा केली गेली.

यावेळी बोलताना त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णयावरही भाष्य केलं. आज अभिमानाने सांगावे वाटते की, केंद्र सरकारला ते काळे कायदे मागे घ्यावे लागले. पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमधील, हरियाणामधील लाखो शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात लढा दिला. अनेकांनी आपले प्राण गमावले, तरी शेतकरी मागे हटले नाहीत. कायदे मागे घेण्याचे आश्वासन जरी पंतप्रधानांनी दिले असले तरी संसदेत कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस पक्ष याचा पाठपुरावा करणार असल्याची माहितीही यावेळी रजनी पाटील यांनी दिली.

त्याचबरोबर, सातशेहून अधिक शेतकरी या आंदोलनात शहीद झाले त्यांची आठवण म्हणून आम्ही जिल्ह्यात कँडलमार्च काढणार असल्याचे रजनी पाटील यांनी सांगितले. तसेच, आंदोलकांना गाडीखाली चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावरही कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com