Sawant : माझ्या बापाचा फोटो लावू नका म्हणता, मग तुम्ही शिवाजी महाराजांचे फोटो का लावता ?

ज्यांनी बापाची विचारधाराच विकून खाल्ली ते आम्हाला म्हणतात माझ्या बापाचा फोटो लावू नका. (Health Minister Tanaji Sawant)
Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray News, Beed
Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray News, BeedSarkarnama

बीड : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रे विरुद्ध शिंदे सेनेने हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू केली आहे. या संपर्क यात्रेतून शिंदे सेनेतील मंत्री (Shivsena)शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी बीडमध्ये बोलतांना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

माझ्या बापाचे फोटो का लावता? असा जाब तुम्ही आम्हाला विचारता ना? मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता? तुमचा आणि महाराजांचा काय संबंध? असा सवाल सावंत यांनी उपस्थितीत केला. (Beed) तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर नागंड करू, आधी तुमच चारित्र सांभाळा, असा टोला आणि इशारा सावंत यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला.

सावंत यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच माझ्याकडून साहित्यिक भाषणाची अपेक्षा करू नका, असे सांगत शिवसेना व ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. प्रा. तानाजी सावंत हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत असतांना देखील ते विरोधकांवर तुटून पडत होते, आता आपल्या पुर्वाश्रमीच्या नेत्यांवर ते बरसत आहेत.

Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray News, Beed
Parbhani : घरात बसून युद्ध जिंकता येत नाही, कृषीमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला..

बीडमधील मेळाव्यात सावंत म्हणाले, ज्यांनी बापाची विचारधाराच विकून खाल्ली ते आम्हाला म्हणतात माझ्या बापाचा फोटो लावू नका. माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाजांचे फोटो का लावता? तुमचा आणि त्यांचा काय संबंध? आमचे सरकार सत्तेवर येताच मराठ्यांना जाग कशी आली ? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले, पण आम्ही टिकणारे आरक्षण देणार आहोत, असा दावा देखील सावंत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com