Pankaja Munde Rally News : भरकटलेली दिशा अन् त्यामुळे झालेली दशा ; पंकजा मुंडे कशी बदलणार ?

Beed : विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभेवर संधी मिळण्याची अपेक्षा चुकीची नव्हतीच.
Pankaja Munde Rally News
Pankaja Munde Rally NewsSarkarnama

Marathwada Poitical : गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात भावाकडून झालेला पराभव पंकजा मुंडे पचवू शकलेल्या नाहीत. (Pankaja Munde Rally News) या एका पराभवाने पंकजा यांची राजकारणातील दिशा भरकटल्याचे गेल्या चार वर्षात दिसून आले आहे. झालेल्या पराभवाचे खापर आपल्या पक्षातील तेव्हाच्या नेत्यांवर फोडून पंकजा यांनी पहिल्यांदा राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाची नाराजी ओढावून घेतली होती.

Pankaja Munde Rally News
Dhananjay Munde Advice Pankaja : पंकजाताई, कुठं काय बोलावं अन्‌ त्या बोलण्यानं आपलं नुकसान होणार नाही, याची काळजी घे; धनंजय मुंडे यांचा सल्ला

त्यामुळे अनेकदा पराभूत झालेल्यांना पण पक्ष नेतृत्वाकडे बोट न दाखवता शांत राहिलेल्यांना संधी मिळाली, पण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आणि स्वतःकडे कर्तृत्व असून देखील पकंजा यांची मात्र दशाच झाली. (Gopinath Munde) गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि स्मृतीदिन या दोन महत्वाच्या दिवशी पंकजा मुंडे (Pankaja Munde) गोपीनाथ गडावरून आपल्या समर्थकांशी संवाद साधतात. मोठे शक्तीप्रदर्शन करतात, भाजपमधील नाराजांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतात, पण चार वर्षात त्यांना यात यश आलेले नाही.

उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही, मी कुणापुढे पदर पसरणार नाही, झुकणार नाही ही टाळ्या मिळवणारी वाक्य त्यांच्या आजच्या भाषणातूनही आली. मी नाराज नाही हे वारंवार पंकजा यांना का सांगावे लागते? हा देखील मोठा प्रश्न त्यांच्या आजच्या भाषणातून पुन्हा त्यांच्या समर्थकांना निश्चित पडला असेल. (Marathwada) चार वर्षात आपल्याला पक्षाने काही दिले का? अशी जाहीर विचारणा म्हणजे नाराजी नाही का? परंतु आता पंकजा आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून त्या नाराज नाहीत, असे स्पष्टीकरण देण्याचा जणू पायंडाच पडला आहे.

पंकजा यांच्या भाषणा दरम्यान, आज घडलेली एक घटना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात काय सुरू आहे? हे दाखवण्यासाठी पुरेशी म्हणावी लागेल. पंकजा यांचे भाषण सुरू असतांनाच एक कार्यकर्ता उठून उभा राहिला आणि तुम्ही आता स्वतःचा पक्ष काढा, आम्ही तन, मन आणि रक्त देवू, असे म्हणाला. ही भावना त्या एकट्याची नाही, तर गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची असावी. पक्ष किंवा नेत्यांबद्दल जाहीर टीका करणे ही भाजपची संस्कृती नाही असे सांगितले जाते. पंकजा नेमकं याच्या उलट वागल्याचे बोलले जाते.

विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभेवर संधी मिळण्याची अपेक्षा चुकीची नव्हतीच. पण त्यावर डावलल्यानंतर ज्या पद्धतीने पंकजा यांनी टीका केली, त्याचेच फळ त्यांना अजूनही भोगावे लागत आहे. एकनाथ खडसे यांची गोपीनाथ गडावरील उपस्थिती, पंकजा, प्रतिम मुंडे यांच्याशी ्यांनी बंद दाराआड केलेली चर्चा पंकजा यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. पंकजा यांनी पक्ष सोडून जावे अशी वेळ त्यांच्यावर आणली जात असल्याचे नाथाभाऊंनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Pankaja Munde Rally News
Shinde Group Offers Pankaja Munde: शिंदे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडेंना पायघड्या, पक्षात आल्यास स्वागत...

कदाचित त्यांच्या अनुभवातून त्यांनी हे सांगितले असावे. पण खडसे आणि मुंडे यांच्यात असलेला फरक भाजप नेतृत्वाला चांगला माहित आहे. त्यामुळे पंकजांच्या बाबतीत भाजपचे नेतृत्व घाईने कोणताच निर्णय घेणार नाही हे चार वर्षात दिसून आले आहे. पंकजा नाराज आहेत हे विरोधकांनीही मान्य केले आहे, म्हणूनच जेव्हा जेव्हा पंकजा यांचे गोपीनाथ गडावरून भाषण झाले, त्यानंतर त्यांना विविध पक्षांकडून प्रवेशासाठी साकडे घातले जाते. आजच्या भाषणानंतर शिंदे गटाकडून पंकजा यांच्यासाठी आपण पायघड्या घालू असे सांगत त्यांच्या नाराजीच्या चर्चेला हवा देण्याचे काम केले.

त्यामुळे पंकजा यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले का? तर निश्चितच केले आहे. त्यामुळे आता फक्त भाषण करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे, तरच समर्थकांचा विश्वास कायम राखता येईल. पंकजा यांच्यापाठीशी मोठी शक्ती आहे, त्यामुळे त्यांनी आज सांगितल्याप्रमाणे निर्णय घेतला तर तो सर्वानचा धक्का देणारच असेल. कुठल्याही पक्षाच्या दावणीला जाण्यापेक्षा स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय पंकजा यांनी घेतला तर त्यांना राज्यातील छोटे पक्ष देखील साथ देतील आणि राज्यात एक मोठी ताकद निर्माण होवू शकते.

Pankaja Munde Rally News
Eknath Khadse Meets Pankaja Munde : खडसेंच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार ; खडसे म्हणाले ; 'संघर्षयात्री..'

शिवसेनेमध्ये पडलेली फूट, महाविकास आघाडीतील तीन पक्षांची `तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना`, अशी झालेली स्थिती पाहता राज्यात आणखी एका नव्या पर्यायाचा प्रयोग यशस्वी होवू शकतो. कदाचित ही वेळ येत्या सहा महिन्यात येवू देखील शकते. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून माझे काय चुकले हे विचारणार असल्याचे म्हटले आहे. ही भेट आणि त्या भेटीत जे काही घडेल त्यानंतर राज्याच्या राजकाणार पुन्हा एकदा भूकंप येवू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com