खतगावकर समर्थकाच्या माघारीने साबणेंचा जीव भांड्यात; आता बारा उमेदवार रिंगणात

(Deglur-Biloli By Election)बारा उमेदवांरामधील सहा उमेदवार मतदारसंघातील तर सहा उमेदवार बाहेरचे आहेत.
खतगावकर समर्थकाच्या माघारीने साबणेंचा जीव भांड्यात; आता बारा उमेदवार रिंगणात
Jitesh Antaurkar-Subhash SabneSarkarnama

देगलूर ः नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या देगलूर - बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. १३) नऊ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणुकीच्या रिंगणात बारा उमेदवार असणार आहेत. यामध्ये प्रमुख पक्षासह सहा अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बारा उमेदवांरामधील सहा उमेदवार मतदारसंघातील रहिवासी असून सहा उमेदवार बाहेरच्या मतदारसंघातील रहिवासी आहेत.

मागील निवडणुकीच्या वेळी वंचित आघाडीचे उमेदवार असणारे रामचंद्र भंराडे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज माघारी घेतला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा तुळशीराम कांबळे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी आज नाट्यमयरित्या मागे घेतली. त्यामुळे खतगावकर गट निवडणुकीपासून अलिप्त राहणार, अशी मतदारसंघात होत असलेली चर्चा तूर्तास तरी थांबली आहे.

वनसेवेतील सेवानिवृत्त अधिकारी विश्वंभर जळबा वरवंटकर यांनी निवडणुकीतुन माघार घेऊन काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शविल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रल्हाद हटकर, धोंडीबा कांबळे, सूर्यकांत भोरगे, रामचंद्र भरांडे, आनंदा रुमाले, लक्ष्मण देवकरे, विठ्ठलराव चाबुकसार, विश्वंभर वरवंटकर, सिद्धार्थ हटकर या नऊ जणांचा समावेश आहे.

प्रारंभी एकूण २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील नऊ जणांनी माघार घेतली व दोन बाद झाले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात बारा उमेदवार असणार आहेत.जितेश अंतापूरकर (काँग्रेस), सुभाष साबणे (भारतीय जनता पार्टी), डॉ. उत्तम इंगोले (वंचित बहुजन आघाडी), विवेक सोनकांबळे केरूरकर (जनता दल धर्मनिरपेक्ष), परमेश्वर वाघमारे (बहुजन भारत पार्टी), डी. डी. वाघमारे (रिपाई, खोब्रागडे गट), अरुण दापकेकर (अपक्ष), साहेबराव गजभारे (अपक्ष), भगवान कंधारे (अपक्ष), मारुती सोनकांबळे (अपक्ष), विमल वाघमारे (अपक्ष), सदाशिव भुयारे (अपक्ष)यांचा यामध्ये समावेश आहे.

खतगावकर सक्रीय होणार

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व त्यांच्या सून जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. मीनल पाटील खतगावकर मतदारसंघात फिरकले नसल्याने व त्यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा तुळशीराम कांबळे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी या सर्व बाबींची या निवडणुकीत चर्चा झाली होती.

Jitesh Antaurkar-Subhash Sabne
आतषबाजी, हारतुरे कशाचा एवढा आनंद झाला? तुम्ही चिखल नाही शेतकऱ्यांच्या भावना तुडवल्या

मात्र, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नांदेड येथे आगमन झाल्यानंतर काही ‘गुप्तगू’झाल्याची चर्चाही येथे रंगू लागली होती. मात्र, आज त्यांचे समर्थक अपक्ष अर्ज भरलेले धोंडीबा कांबळे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आता खतगावकर गट भाजपाच्या प्रचारात उतरेल, असा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.