तसं काही मनात असतं तर, आम्ही सभागृहातच गेलो नसतो... अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan म्हणाले, नांदेड Nanded जिल्ह्याचा पालकमंत्री Guardian minister म्हणून शिवसेनेच्या Shivsena आमदारांच्या MLAs मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत.
Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi Newssarkarnama

नांदेड : बहुमत सिध्द करण्यासाठी झालेल्या मतदानाला आम्ही तीन ते चार मिनिटे उशीरा पोहोचलो. सभागृहाच्या लॉभीमध्ये असतानाच दोर बंद झाली. अध्यक्षांकडे चिठ्ठीही आम्ही पाठवली होती, त्यांनी वेळ गेल्यामुळे निर्णय घेतला नाही. त्याबद्दल त्यांना आम्ही दोष देणार नाही. मुळात तसं काही मनात असते तर आम्ही सभागृहातच गेलो नसतो, जाईपर्यंत दरवाजे बंद झाल्याने आमचा नाईला होता, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.(Ashok Chavan News in Marathi)

अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना बहुमतावेळी काँग्रेसचे सात वेळेत पोहोचू शकले नाहीत, याविषयी भाष्य केले. अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसची सात मते गेली आहेत. त्यामुळे याची चौकशी होऊन जबाबदार असलेल्यावर कारवाई अपेक्षित आहे. अध्यक्षांच्या नेमणूकीवेळी आम्ही मतदान केले. दुसऱ्या दिवशी आम्ही उशीरा पोहोचलो.(Nanded Latest Marathi News)

Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
चव्हाण, शिंदेंसह ११ काॅंग्रेस आमदार संकटात : निलंबन किंवा हकालपट्टी यावर नेतृत्व ठाम!

तीन चार मिनिटे उशीर झाला. सभागृहाच्या लॉभीत पोहोचलो, त्यावेळी दारे बंद झाली. काही आमदारांमध्ये काँग्रेसचेच नव्हे तर राष्ट्रवादीचेही आमदार होते. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सभागृहाची दारे लॉक होतात. आम्ही अध्यक्षांकडे चिठ्ठी पाठवली होती. पण, त्यांनी काहीही निर्णय घेतला नाही. पण, त्यांना आम्ही दोष देणार नाही. मुळात तसं काही मनात असतं तर, आम्ही सभागृहातच गेलो नसतो. जाईपर्यंत दरवाजे बंद झाले त्याला नाईला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
राष्ट्रवादी लागली कामाला; शंभर प्लसचा दिला नारा

शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता, या आरोपावर अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे आमच्याकडे आले होते. त्यावेळी निधीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने आम्ही सर्वजण होतो, त्यांनी निधीबाबतचा शब्द पाळला आहे.

Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
ब्रिटनमध्ये जॉन्सन सरकार कोसळले; तब्बल ४० मंत्र्यांच्या राजीनाम्यापुढे पंतप्रधान झुकले

नव्या सरकारच्या कामाविषयी बोलण्यास नकार देत ते म्हणाले, अजून नव्या सरकारला मंत्रीमंडळ स्थापन करायचे असून ११ तारखेला महत्वपूर्ण निकाल आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा, विश्वासदर्शक ठराव, उपाध्यक्षांबाबतचा निर्णय हे सर्व विषय त्याच दिवशी ऐकून निर्णय देऊ, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आताच प्रतिक्रिय देणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com