विजय वरपुडकरांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला जिल्ह्यात `अच्छे दिन` येणार?

(Vijay Warpudkar Connect With Bjp)केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही अनेकवेळा विजय वरपुडकरांनी भेट घेतली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रणही दिले होते.
Vijay Warpudkar In Bjp
Vijay Warpudkar In BjpSarkarnama

परभणीः जिल्हयातील राजकारणात सातत्याने दबदबा कायम राखणाऱ्या नेत्यापैकी सर्वात महत्वाचे नाव म्हणजे आमदार सुरेश वरपुडकर. मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची जिल्ह्याला आणि मराठवाड्याला ओळख आहे. परंतू, आता त्यांच्या घरातच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. त्यांचे सख्खे बंधू विजय वरपुडकर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाल्याचे बोलले जाते.

विजय वरपुडरकरांच्या रुपाने भाजपला धाडसी व आक्रमक चेहरा मिळाल्याने याचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला निश्चित फायदा होण्याची शक्यता आहे. कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांचे बंधु विजय वरपुडकर यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. विजय वरपुडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होत्या. याबद्दल खुद्द विजय वरपुडकर यांनी देखील जाहिरपणे सांगितले होते. परंतू योग्य वेळ व मुहूर्त त्यांना मिळत नव्हता.

अखेर त्यांचा पक्ष प्रवेश आज झाला. जेष्ठ नेते शरद पवार यांनी जेव्हा कॉग्रेसमधून वेगळे होत, राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना केली. तेव्हा शरद पवारांसोबत परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह सुरेश वरपुडकर हे देखील होते. त्यामुळे सहाजिकच त्यांचे बंधू विजय वरपुडकर हे देखील राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सामिल झाले. विजय

वरपुडकरांच्या धाडसी व आक्रमक स्वभावामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली देखील. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ते दिर्घकाळ राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसने जिल्ह्यात पाळेमुळे घट्ट केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वाधिक जागाही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदरात पडल्या.

कालातंरांने सुरेश वरपुडकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची साथ सोडत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सावली सारखे राहणारे विजय वरपुडकर हे देखील कॉग्रेसवासी झाले. परंतू त्यांच्या राजकीय आयुष्याला कौटूंबिक कलहाचे ग्रहण लागल्याने ते गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रापासून दुर राहत होते. गेल्या काही दिवसापासून ते भाजप नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीतही विजय

वरपुडकरांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाचे खुले समर्थन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत रंगत भरली गेली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही अनेकवेळा विजय वरपुडकरांनी भेट घेतली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय वरपुडकर यांना मुंबईत या असे निमंत्रणही दिले होते. तेव्हापासूनच विजय वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

Vijay Warpudkar In Bjp
ओबीसी जागर मेळावा, अन् डाॅ. कराडांनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

विजय वरपुडकर यांचा ग्रामीण भागाशी असलेला थेट संपर्क भाजपला निश्चितच फायद्याचा ठरणार आहे. पूर्णा, पालम, ताडकळस इतकेच काय तर परभणी तालुक्यातील बराचसा भाग आजही विजय वरपुडकरशी कनेक्ट आहे. एक धाडसी, आक्रमक व कणखर चेहरा भाजपच्या गळाला लागल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत याचा चांगला फायदा पक्षाला होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com