मेटेंचे मराठा आरक्षण, शिवस्मारकाचे स्वप्न सरकार पूर्ण करेल का?

न्यायीक प्रकरणामुळे शिवस्मारकाची विटही उभारली गेली नाही. आघाडी सरकारच्या काळात न्यायालयीन लढाईत सरकार कमी पडले, तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही असे आरोप विनायक मेटे करत. (Vinayak Mete)
Let. Vinayak Mete-Cm Eknath Shinde- Devendra Fadanvis News
Let. Vinayak Mete-Cm Eknath Shinde- Devendra Fadanvis NewsSarkarnama

बीड : मराठा समाजाचे आरक्षण आणि अरबी समुद्रातील शिवस्मारक हा विनायक मेटे यांच्या समाजकारण आणि राजकारणाचा आत्मा होता. सातत्याने ३० वर्षे (Vinayak Mete) विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणची चळवळ तेवत ठेवली. त्यांनी मुस्लिम समाजाचे आरक्षण, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही लाऊन धरला. (Beed) त्यांच्या समाजकारणाचा आत्मा असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील बैठकीला जातानाच काळाने त्यांना हिरावून घेतले.

त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपुरे राहीले असले तरी आता त्यांच्या विचाराचे सरकार शिवस्मारक आणि मराठा आरक्षण देऊन त्यांचे स्वप्न पुर्ण करेल का, हे पहावे लागेल. (Marathwada) १९९१ - ९२ पासून सामाजिक चळवळीत असल्यापासून मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला.

पुढे भाजप, नंतर राष्ट्रवादी व आता भाजप युतीसोबत असलेल्या विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी कायम आंदोलने केली. यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांनी आंदोलने केली. शिवस्मारकाच्या बाबतीतही त्यांनी कायम आवाज उठविला. धनगर समाज व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्देही त्यांनी कायम लाऊन धरले.

पुर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात आणि मागच्या महायुती सरकारने दिलेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मागच्या वेळी महायुती सरकारच्या काळात त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपदही मिळाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे भूमिपुजनही झाले. मात्र, न्यायीक प्रकरणामुळे शिवस्मारकाची विटही उभारली गेली नाही.

Let. Vinayak Mete-Cm Eknath Shinde- Devendra Fadanvis News
विनायक मेटेंचा देवेंद्र फडणवीसांना मध्यरात्री सव्वादोनला मेसेज!

तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयीन लढाईत सरकार कमी पडले, शिवस्मारकाच्या मुद्द्यावर तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही असे आरोप विनायक मेटे करत. आता योगायोगाने त्यांच्या विचाराचे सरकार सत्तेत आल्याने मराठा आरक्षणाबाबत आशा दुणावल्या होत्या. आरक्षणाच्याच बैठकीसाठी बीडची त्यांच्या नेतृत्वाखालील नियोजित तिरंगा फेरी सोडून मेटे मुंबईकडे निघाले आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला.

त्यांच्या समाजकारणातील आत्मा असलेले मराठा आरक्षण त्यांच्या हयातीत भेटले पण टिकले नव्हते. शिवस्मारकही रखडलेले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे मराठा आरक्षण व शिवस्मारकाचे स्वप्न पूर्ण करुन त्यांना श्रद्धांजली वाहतील का हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com