जल आक्रोश : पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या ८० वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री जातील का ?

केंद्राच्या पैशावर योजनेचे काम सुरू आहे. वेळीच टेंडर काढले असते तर आज ४० पैकी किमान २५ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम झाले असते. पण सध्या अर्धा किलोमीटरही झालेले नाही. (Bjp)
जल आक्रोश : पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या ८० वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री जातील का ?
Bjp Leader Devendra FadanvisSarkarnama

औरंगाबाद : झुकेगा नही साला, म्हणत मुंबईत रस्त्यावर उतरलेल्या ८० वर्षाच्या आजीच्या घरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले. आज औरंगाबादेत पाण्यासाठी डोक्यावर हड्डा घेऊन ८० वर्षाच्या आजी सहभागी झाल्या होत्या. त्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांचा कानावर जाईल का? या आजीला भेटायला ते येतील का? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

संभाजीनगर करायचे कशाला ते तर झाले आहे असे समजा म्हणणारे मुख्यमंत्री कदाचित उद्या नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असेही म्हणतील, असा टोला देखील फडणवीसांनी जल आक्रोश मोर्चातून उद्धव ठाकरेंना लगावला. औरंगाबाद (Aurangabad) तर आम्ही जिंकणारच, पाणीही आणणार, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. शहरातील पाणी प्रश्नावर भाजपच्या (Bjp) वतीने आज महापालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महापालिकेसमोर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला. महापालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचा आरोप करतांनाच फडणवीस म्हणाले, आजचा मोर्चा हा औरंगाबादच्या इतिहासातील अभूतपूर्व असा मोर्चा होता. याआधी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली याच मार्गाने मोर्चा निघाला आणि सत्ता परिवर्त घडले. आज पुन्हा आम्ही त्याच मार्गाने मोर्चा काढला आहे, सत्ता परिवर्तन तर निश्चितच होणार आहे, पण आम्हाला व्यवस्था परिवर्तन करायचे आहे.

गेली कित्येक वर्ष शिवसेनेने निर्माण केलेली भ्रष्ट व्यवस्था उधवस्त केल्याशिवय आम्ही आता शांत बसणार नाही. पाण्यासाठीचा संघर्ष आता छेडलाय, जोपर्यंत तुम्हाला पाणी मिळणत नाही तोपर्यंत आम्हीही झोपणार नाही आणि त्यांनाही झोपू देणार नाही. शिवसेनेने आम्ही लावलेली पोस्टर फाडली, पण जनतेच्या मनात असलेला आक्रोश कसा फाडणार, असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी केला. ज्या जनतेला तुम्ही पाण्यासाठी तरसवत आहात, त्या जनतेचे शिव्या-शाप तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Bjp Leader Devendra Fadanvis
जल आक्रोश : सत्ता बदल तर करूच, पण भ्रष्ट व्यवस्था संपवून नागरिकांना आधी पाणी देऊ ...

आमच्या विजयाताई राहाटकर असतांना आम्ही समांतर जलवाहिनी योजना आणली पण दोन वर्षात यांनी ही योजना खाऊन टाकली, योजनेचा सत्यानाश केला. टक्केवारीसाठी टेंडर न काढता करार बदलले, लोखंडीच्या ऐवजी प्लास्टीकच्या पाईपला मान्यता दिली. मी मुख्यमंत्री असतांना अनेकदा बैठका घेतल्या पण मला असे लक्षात आले की ही योजना काही आता होत नाही. नंतर आम्ही २०५० मधील शहराचा विस्तार लक्षात घेऊन १६८० कोटींची योजना मंजुर केली.

त्यात महापालिकेला साडेपाचशे ते सहाशे कोटी भरायचे होते. तेव्हा आमदार अतुल सावे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले महापालिकेकडे पगाराला पैसे नाही, ते एवढे पैसे कुठून भरणार. मी सांगितले सगळे पैसे राज्य सरकार देईल, महापालिकेने फक्त एक रुपया भरावा. पण पुढे वाटाघाटी आणि टक्केवारीमुळे या योजनेचे काम रखडले. पुढे दुर्दैवाने सरकार बदलले. याजनेत वाटा किती यासाठी वाटाघाटीत सात महिने वाया गेले. नंतर टेंडर काढले, पण योजनेसाठी राज्य सरकारने एक रुपयाही दिला नाही. केंद्राच्या पैशावर योजनेचे काम सुरू आहे.

भ्रष्टाचाराचा अड्डा उधवस्त करा..

वेळीच टेंडर काढले असते तर आज ४० पैकी किमान २५ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम झाले असते. पण सध्या अर्धा किलोमीटरचेही काम झालेले नाही, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला. मुबई, एमएमआरडीच्या पलिकडे महाराष्ट्र आहे हे मुख्यमंत्र्यांना माहितच नाही. म्हणून मराठवाडा, विदर्भासाठी ते फुटी कवडी देखील देत नाही.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना आणल्या पण त्याचा या सरकारने मुडदा पाडला. मराठवाडा वैधानिक महामंडळ बंद पाडले, त्याला एक पैसा दिला नाही. त्यामुळे जनतेच्या विरोधात जो काम करतो त्याला जनता खाली खेचते. तुम्हाला ही संधी चालून आली आहे. भ्र्ष्टाचाराचा अड्डा बनलेल्या महापालिकेतील सत्ता उलथवून टाका, असे आवाहन देखील फडणवीस यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in