पक्षाने प्रदेशाध्यक्षपद दिले आता शेख गावची नगरपंचायत ताब्यात घेणार का?

सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी धसांचे कट्टर समर्थक असलेले महेबुब शेख राष्ट्रवादीतच थांबले. (Beed Ncp)
Mheboob Shaikh
Mheboob ShaikhSarkarnama

बीड : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यात आष्टी/पाटोदा/ शिरुर कासार या विधानसभा (Beed) मतदार संघातील तीन नगर पंचायतींच्याही निवडणुका होता आहेत. (Ncp) शिरुर कासारचे महेबुब शेख यांना राष्ट्रवादीने युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले. (Marathwada) आता शेख त्यांच्या गावच्या नगर पंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकणार का? हे पहावे लागेल.

सद्यस्थितीत या पाचही नगर पंचायतींवर प्रशासक असले तरी तत्पुर्वी एकाही नगर पंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता नाही. वडवणीत भाजप, केजमध्ये काँग्रेस आणि आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन नगर पंचायतींवर भाजपचा झेंडा आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकीवेळी सुरेश धस राष्ट्रवादीत होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली तीनही नगर पंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता. धसांच्या नेतृत्वाखालील पॅनलची लढत त्यावेळी तत्कालिन भाजप आमदार भिमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलशी झाली होती. त्यात धसांच्या समर्थकांनी बाजी मारली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी धसांचे कट्टर समर्थक असलेले महेबुब शेख राष्ट्रवादीतच थांबले.

मात्र, धसांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्या समर्थक सर्व नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला आणि या तीनही नगर पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला. मात्र, धसांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीत थांबलेल्या महेबुब शेख यांना राष्ट्रवादीने युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले. मात्र, त्यांच्या पाठीशी गावच्या नगर पंचायतीमधील १७ पैकी केवळ एक नगरसेवक थांबला.

Mheboob Shaikh
नार्वेकरांना 'बाबरी'ची आठवण अन् राणेंनी ठाकरेंना डिवचलं; फडणवीस खदखदून हसले...

सद्यस्थितीत सर्व नगरसेवक भाजपमध्येच काही धसांकडे तर काही धोंडेंकडे आहेत. आता या मतदार संघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. तर, याच गावचे भूमिपुत्र महेबुब शेख राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत आहेत.

प्रदेशाध्यक्षपदामुळे त्यांची उठबस नेहमी पवारांसह पक्षातील वरिष्ठांसोबत असते. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात पक्षीय प्रोटोकॉलनुसार त्यांना पहिल्या रांगेतील खुर्चीही असते.आता पक्षाने त्यांना संधी दिल्याने ते राज्यभर वावर करतात. आता गावाच्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत ते व आजबे पक्षाचा झेंडा फडकवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com