Marathwada Railway Issue : पाऊणशे वर्षानंतर रेल्वेचा संघर्ष रावसाहेब दानवे सोडवणार का ?

Latur News : प्रवाशांची रेल्वेगाडीच उपलब्ध नसल्याने असुविधा होऊ लागल्यास स्थानक पुनर्विकासाचा उपयोग काय?
Marathwada Railway Issue :
Marathwada Railway Issue : Sarkarnama

Marathwada Politics : निजामाच्या तावडीतून स्वतंत्र होऊनही मराठवाडा दिल्ली सत्तेपासून सतत उपेक्षीतच राहिला आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्ती संग्रामामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विनाशर्थ महाराष्ट्रात सामिलही झाला. पण पाऊनशे वर्षानंतरही पाणी, रेल्वे, शिक्षण, रोजगार या पायाभूत सुविधांसाठी सतत झगडावे लागते आहे. तब्बल पाच-पाच वर्षे खासदारांनी एक रेल्वेगाडीची मागणी केली तरी ती प्रशासनाकडून पूर्ण होत नाही. आता रेल्वेराज्यमंत्रीपद मराठवाड्यात आहे, पण गाडीचे कोच सुद्धा वाढवले जात नाहीत.

लातूर आणि धाराशिव रेल्वेस्थानकाचा अमृत भारत योजनेत पुनर्विकास केला जाणार आहे. यामुळे स्थानक सुंदर, सुखद होईल पण प्रवाशांची रेल्वेगाडीच उपलब्ध नसल्याने असुविधा होऊ लागल्यास स्थानक पुनर्विकासाचा उपयोग काय? लातूर-मुंबई गाडी प्रंचड मागणी आहे, त्यासाठी नवीन गाडी सुरु करावी, किमान सात ढबे वाढवावे, अशी मागणी सतत लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट रेल्वेमंत्र्याकडेही केली. तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाडयातील असूनही धाराशिव, लातूरची रेल्वेबाबतची उपेक्षा कायम ठरलेलीच आहे.

Marathwada Railway Issue :
Thackeray group slam Ajit Pawar : सत्तेची हाव नाही, मग काकांचा पक्ष का फोडला ? अजितदादांच्या विकासाची व्याख्या म्हणजे...

लातूर स्थानकावरून दररोज सुमारे पाच हजार प्रवाशी प्रवास करतात. यातील तब्बल साडेतीन हजार प्रवासी मुंबई, पुणेकडे प्रयाण करतात. प्रत्यक्षात मुंबईसाठी रेल्वे तिकिट मिळणे दिव्यच झाले आहे. मागणी मोठी आणि उपलब्ध तिकिट अत्यंत तोकडे ही स्थिती रोजचीच झालेली आहे. तसेच लातूर-मुंबई गाडीचा अंतिम थांबा हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, मात्र अनेक वेळा अचानक या गाडीला साईडलाईनवर दोन-दोन तास उभे केले जाते. किंवा दादरपर्यंतच ही गाडी नेली जाते. यागाडीला दर्जा जरी सुपरफास्टचा असला तरी तिकिट दराशिवाय रेल्वेप्रशासन तशी वागणूक देताना दिसत नाही.

Marathwada Railway Issue :
Praniti Shinde News: काँग्रेस सोलापुरातील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत; 'भावी खासदार'चा झळकला 'बॅनर' !

गेल्या सहा वर्षापासून लातूर-मुंबई गाडी सतरा डब्यांची आहे. गाडी पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी चोवीस डब्यांपर्यंत असली पाहिजे. मात्र मागणी असूनही डब्यांची संख्या वाढविली जात नाही. उलट आहे, ती लातूर-मुंबई गाडीच आठवड्यातील तीन दिवस बिदरपर्यंत वाढविली आहे. यात आता हीच गाडी काडीगुडापर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. पुणे-लातूर इंटरसिटी सुरु करण्याबाबतही मागणी होत होती. तेव्हा रेल्वे प्रशासनाने कोच उपलब्ध नसल्याचे कळवले.

त्यानंतर काही महिन्यांनी प्रशासनानेच कोच उपलब्ध झाल्याचे कळवले, पण गाडी काही सुरु झाली नाही. लातूरमधून पुणे, मुंबईसाठी तब्बल 312 ट्रॅव्हल्स दररोज जातात-येतात, यासाठी दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक नेता स्वतंत्रपणे मागणी करतो पण रेल्वेप्रशासन अजिबात दाद देत नाहीत. विशेष म्हणजे खासदार रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्री पद मिळालेले आहे. पण हे पदाही मराठवाड्याची उपेक्षा थांबवू शकले नाही.

Marathwada Railway Issue :
Jitendra Awhad Vs Chhagan Bhujbal: "ज्यांचं खाल्लं...त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत ; आव्हाडांनी भुजबळांना सुनावले..

लातूर, धाराशिव जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी खासदार डॉ. सुनिल गायकावड, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, क्रीडामंत्री संजय बनसोडे, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार रमेश कराड, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय रेल्वीमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे निवदणे दिली, पण रेल्वे प्रशासन हालायला तयार नाही. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला मराठवाड्याने कायम पाठींबा दिलेला आहे. पण मराठवाडा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतही निसर्गाकडून आणि सत्ताधाऱायांकडून उपेक्षा ठरलेली आहेच.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in