MNS : `राजा`च संकटात `साथ` देणाऱ्यांचे काय ?

राज ठाकरे यांना अटक होणार की काय ? अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. मनसेच्या नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात येत आहेत. (MNS)
MNS : `राजा`च संकटात `साथ` देणाऱ्यांचे काय ?
MNS Chief Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजीची औरंगाबादेतील सभा अपेक्षेप्रमाणे गाजली. तुंडब भरलेल्या मैदानासमोर राज (Raj Thackeray) यांनी तडाखेबंद आणि त्यांना साजेशे असे भाषण केले. पोलिसांनी घालून दिलेल्या सोळापैकी बहुतांश अटींचे पालन झाले तरी मुख्य चार अटी धुडकावल्या गेल्या. (MNS) डेसीबल, तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत राज ठाकरे यांनी सभा तर जिंकली पण स्वतः मात्र अडकले अशीच काहीसी परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे. मनसेकडून माझ्या राजाला साथ द्या, अशी साद घातली जाते. (Maharashtra) आज मात्र राज संकटात सापडल्यामुळे आता साथ देणाऱ्यांचे काय ? असा प्रश्न आहे.

औरंगाबादेतील सभेत इतिहासाचे चुकीचे दाखले, राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीयवादाचे केलेले आरोप आणि भाषणाच्या शेवटी मशिदीवरील भोंग्याच्या विषयावरून वापरलेली चिथावणीखोर भाषा राज ठाकरे यांच्या अंगलट आल्याचे राज्यात त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या सुरू असलेल्या हालचालींवरून स्पष्ट झाले आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला होता.

पण ईद आणि अक्षयतृतीया असल्याने त्यांनी ४ तारखेनंतर भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावायचा शांत बसायचे नाही, असे आदेशच सभेतून दिलेले आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार, गृहविभाग आणि पोलिस प्रशासन तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे कायद्याचे राज्य आहे, इथे अल्टीमेटमची भाषा चालणार नाही, असा दम भरल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणारे खंबीर सरकार असल्याने अल्टीमेट वगैरे खपवून घेणार नाही असे म्हटले आहे.

दुसरीकडे न्यायलायाने देखील राज ठाकरेंना कोर्टासमोर आणून उभे करा, असे निर्देश पोलिसांना देत राज ठाकरेंच्या भाषणाची गंभीर दखल घेतल्याचे दाखवून दिले आहे. पोलिस महासंचालकांच्या बैठका आणि त्यानंतर त्यांनी कारवाईचे दिलेले संकेत पाहता राज ठाकरे यांना अटक होणार की काय ? अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. मनसेच्या नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात येत आहेत.

MNS Chief Raj Thackeray
राज ठाकरेंना इशारा?... राणा दाम्पत्याचे काय झाले लक्षात आहे ना?

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांचे भाषण आणि त्यांच्या भोंग्याचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. आज ईद, अक्षयतृतीया, परशुराम जंयती असल्यामुळे कदाचित कारवाई उद्या म्हणजेच ४ तारखेच्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादच्या सभेत भाषणा दरम्यान, भोंग्यावरून अजान सुरू झाल्याचे सांगत राज ठाकरे यांनी पोलिसांना उद्देशून हा भोंगा आधी बंद करा, नाहीतर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येणार नाही.

हे असे ऐकणार नसतील तर एकदा होऊनच जाऊ द्या, अशी धमकीची भाषा वापरली होती. औरंगाबाद पोलीसांकडून देखील या संदर्भातला अहवाल गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कुठल्याही क्षणी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे राजाच अडचणीत सापडल्यामुळे त्याला साथ देणाऱ्यांचे काय ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.