विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे विधानसभेची उमेदवारी सोडणार?

Beed Politics| Pankaja Munde latest news| 2009 पासून पंकजा मुंडे परळी विधानसभेत भाजपच्या तिकीटावर निवडून येत होत्या.
विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे विधानसभेची उमेदवारी सोडणार?
Pankaja Munde news in Marathi, Beed News, Beed Politics News

बीड : आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळणार की नाही, यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. पण त्यासाठी पंकजा यांना अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या दाव्यावर पाणी सोडावे लागणार आहे. (Pankaja Munde news in Marathi)

2009 पासून पंकजा मुंडे परळी विधानसभेत भाजपच्या तिकीटावर निवडून येत होत्या. पण 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता पंकजा यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होताना दिसत आहे. त्यातच विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करीन, अशी भावनाही त्यांनी गोपनाथ गडावर दोन दिवसांपूर्वी बोलून दाखवली.

Pankaja Munde news in Marathi, Beed News, Beed Politics News
बाळासाहेब थोरात यांनी तो किस्सा सांगत केली अजित दादांची स्तुती

मात्र महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे उलटली आहेत.2024 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्यास पुन्हा दोन वर्षांनी विधानसभेसाठी उमेदवारी देता येणार नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तर दूसरीकडे प्रीतम मुंडे आधीच लोकसभा आणि विधानपरिषदेवर असताना पंकजा मुंडे यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळणेही कठीण आहे.

एकाच कुटुंबात किती तिकीटे द्यायची, हा प्रश्न असून भाजपच्या कार्यपद्धतीतही ते बसत नाही. असे भाजप नेते म्हणत आहेत. मात्र, यापुर्वी भाजपकडून विनोद तावडे, आशिष शेलार विधानपरिषदेवर असतानाही त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. हा देखील अपवाद आहे.

त्यातच पंकजा मुंडे यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा असल्याने त्यांनी विधानसभेवरच निवडून येणे सोयिस्कर राहिल. तर परळीत भाजपलाही धनंजय मुंडे यांच्याविरोधात पंकजा मुंडेंसारख्या तगड्या उमेदवाराची गरज आहे. त्यामुळे विधानपरिषदेऐवजी पंकजा मुंडेंनी आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू करावी, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्याकत आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in