Maratha Reservation : ...तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही ; बीडच्या बेलवाडी ग्रामस्थांनी घेतली शपथ

Belwadi News : आरक्षणासंदर्भात घेतला जाणारा निर्णय राज्य सरकारच्या हातात नाही
Belwadi  News :
Belwadi News :Sarkarnama

Beed Politics : जालना जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचे पदसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अशातच कोणतेही आंदोलन न करता बीडमधील बेलवाडी गावच्या ग्रामस्थांनी एक वेगळीच शपथ घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, असा संकल्पच बेलवाडी ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे भाजपसाठी आता इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. इतकेच नव्हे तर, या ग्रामस्थांनी आपण मतदान करणार नसल्याचीही शपथ देखील घेतली आहे.

केंद्रात भाजपाची सत्ता आहे, आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो आणि केंद्रात भाजपा सरकार आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाहीत. अशी शपथ आता बेलवाडी येथील नागरिकांनी घेतली आहे.

Belwadi  News :
Maratha Reservation Protest : हुतात्मा काकासाहेब शिंदेंना अभिवादन करत संभाजीनगर-नगर महामार्ग रोखला..

"आरक्षणासंदर्भात घेतला जाणारा निर्णय राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या वरची मर्यादा आरक्षणाने ओलांडली आहे त्यामुळे कायद्यात जो बदल करण्याचा निर्णयही केंद्र सरकारच घेऊ शकते. केंद्र सरकारने हा बदल करुन आम्हाला आरक्षण द्यावे. केंद्र सरकार कायद्यात बदल करुन आम्हाला आरक्षण देणार असेल तर आम्हीही त्यांच्यासोबत राहू. पण सरकार आरक्षण देणार नसेल तर यापुढे मराठा समाज म्हणून आम्ही भाजपाला मतदान करणार नाही, अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे," असे एका गावकऱ्याने म्हटलं आहे.

"2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही यापुढे भाजपाला मतदान करणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही भाजपाला मतदान करु. अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली आहे.

जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलक आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेत अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. याचे राज्यभर पडसाद उमटू लागले.  जालना जिल्ह्यातील सर्व एसटी बस बंद आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील जालन्यात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना शांततेत आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in