राज्यमंत्री अब्दुल सत्तार मतदारसंघातील नगरपंचयात भाजपकडून खेचणार?

सोयगाव नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सत्तार यांनी आपले लक्ष्य तिकडे केंद्रीत केले आहे. (Minister Abdul Sattar)
Danve-Sattar
Danve-SattarSarkarnama

औरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे आपल्या सिल्लोड सोयगांव मतदारसंघावर कमालीचे वर्चस्व आहे. (Shivsena) नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. परंतु मतदारसंघातील सोयगावची नगरपंचायत मात्र भाजपच्या (Bjp) ताब्यात होती.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यात ग्रामविकास व महसुल सारख्या महत्वाच्या खात्याचे अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत सत्तार ताब्यात घेतात का? हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

सोयगाव नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सत्तार यांनी आपले लक्ष्य तिकडे केंद्रीत केले आहे. शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतांनाच दुसरीकडे महाविकास आघाडी करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून सगळ्याच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता, काॅंग्रेसही त्यात आघाडीवर होती.

परंतु जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे आणि अब्दुल सत्तार यांची जुनी मैत्री पाहता काॅंग्रेसने स्वबळाची भाषा सोडून आता आघाडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शिवसेनेला सोयगांव नगरपंचायत ताब्यात घेण्यात फारशा अडचणी येणार नाही, असे दिसते. गेल्या नगरपंचायतीत भाजपचे ८, शिवसेनेचे ६ तर काॅंग्रेसचे तीन सदस्य होते.

Danve-Sattar
उस्मानाबादच्या कृष्णा तवलेंची बाजी; तीनशे तरूणांमधून युवक काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

दरम्यान भाजपच्या नगराध्यक्षाविरुद्ध एकदा अविश्वास ठराव पारित होऊन शिवसेनेला १३ महिने नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा शिवसेनेच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणत भाजपने शिवसेनेच्या सदस्याला फोडत पुन्हा नगराध्यक्षपद पटकावले होते.

पाच वर्षाच्या कार्यकाळात दोन टर्म नगराध्यक्षपद भाजपकडे तर एकदा शिवसेनेकडे होते. परंतु आता नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी राज्यमंत्री सत्तार कामाला लागले आहेत. भाजप समोर मात्र तीन पक्षांच्या विरोधात लढा देत सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com