Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Bacchu Kadu News : तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली? आजोबांनी बच्चू कडूंना रस्त्यातच सुनावलं

Dharashiv : आमदार कडूंनी केले हसून दुर्लक्ष; पोलिसांची मध्यस्थी

Senior citizen scold MLA : शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यावेळेपासून शिवसेनेतील ४० आणि अपक्ष १० आमदारांवर राज्यातून टीका होत आहे. या टीकेचा अनेकांना वैयक्तिक रोषालाही सामोरे जावे लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) फुटलेल्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यांना गद्दार म्हणून हिणवले जात आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना तर वैयक्तीक टीकेलाही समोरे जावे लागले आहे. त्यांना काही नागरिकांनी थेट सुनावले आहे. त्यांच्यासमोरच टीकात्मक घोषणाही केल्या आहेत.

आज पुन्हा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना एका आजोबांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आजोबांनी कडू यांनी अपेक्षाभंग केल्याची खंतही व्यक्त केली.

Bacchu Kadu
Shinde-Fadnavis government : राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 'एवढी' वाढ

माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना कोर्टाने अडीच हजार दंड आणि एक दिवस कोर्ट संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा सोमवारी (ता. २७) दिली होती. ही शिक्षा संपल्यानंतर कडू कोर्टातून बाहेर जात होते. त्यावेळी ८० वर्षीय शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवून तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली, असा प्रश्न उपस्थित केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

Bacchu Kadu
Dhairyasheel Patil join BJP : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश!

आमदार बच्चू कडू धाराशिव जिल्हा सञ न्यायालयातून बाहेर आले. त्यावेळी घोगरे या ज्येष्ठ शेतकऱ्याने त्यांचा ताफा अडविला. त्यानंतर बच्चू कडू हेही गाडीतून बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्याशी संवांद साधण्याचा प्रयत्न केला. घोगरे यांनी मात्र काही प्रश्न उपस्थित केले. तसेच तुम्ही आमचा अपेक्षाभंग केल्याची खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, "तुम्ही डाकूसोबत का गेलात? शेतकऱ्यांशी गद्दारी का केली? तुम्हाला ज्या आशेने निवडून दिले त्यावर पाणी फिरविले."

Bacchu Kadu
Manish Sisodia Arrest : 'जेल के ताले टूटेंगे मनीष सिसोदिया छूटेंगे'; सिसोदियांच्या अटकेनंतर 'आप' आक्रमक

यावेळी बच्चू कडू यांनी आजोबांचे म्हणण्याकडे हसून दुर्लक्ष केले. त्यानंतर ते गाडीत जाऊन बसले. त्यानंतर आजोबांनीही थेट गाडीसमोरच उभे राहून आक्रोश व्यक्त करण्यास सुरूवात केली. दरम्यान, कडू यांचे कार्यकर्ते आजोबांच्या बोलण्यामुळे आक्रमक झाले होते. त्या आजोबांना लोक गाडीसमोरून हटविण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र ते कुणाचेच ऐकत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करीत आजोबांना रस्त्यावरून बाजूला नेले.

शेतकरी घोगरे म्हणाले की, "बच्चू कडू यांना ज्या धोरणांनी निवडून दिले, ज्या आशेने निवडून दिले त्यानुसार ते वागत नाहीत. ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले. राज्यात जे सुरू आहे ते योग्य नाही. हा प्रकार घटनाबाह्य आहे. यातून घटनेची पायमल्ली झाली."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com