Bhumre V/S Khaire On Loksabha News : कोण कुणाचे डिपाॅझिट जप्त करणार ? खैरे-भुमरे यांच्यात जुंपली..

Marathwada : लोकसभा निवडणुकीत माझे डिपाॅझिट जप्त करण्याइतकी भुमरेंची औकात नाही.
Minister Sandipan Bhumre-Khaire News
Minister Sandipan Bhumre-Khaire NewsSarkarnama

Shivsena : जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा संघर्ष भडकलेला पाहिला मिळतो. संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत राज्य पातळीवर एकमेकांना भिडले आहेत. (Bhumre V/S Khaire On Loksabha News) तर दुसरीकडे जिल्ह्यात पालकमंत्री संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांनी नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

Minister Sandipan Bhumre-Khaire News
Sharad Pawar's Friendship: मैत्री जपणारा नेता, मित्र आजारी असल्याचे समजताच पवारांची हाॅस्पीटलमध्ये धाव..

लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आलेल्या असतांना भुमरे आणि खैरे (Chandrakant Khaire) यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच पेटले आहे. लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार हे अद्याप ठरलेले नसले तरी खैरे-भुमरे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यासारखे एकमेकांना आव्हान देत आहेत. (Shivsena) दोन दिवसांपुर्वी एका पत्रकार परिषदेत खैरे यांनी भुमरे यांच्यावर टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला होता.

त्याला प्रत्युत्तर देतांना भुमरे यांनी खैरे व त्यांच्या मुलालाच टक्केवारीची सवय असल्याचा पलटवार केला होता. (Aurangabad) खैरेंचा आरोप जिव्हारी लागेल्या भुमरेंनी तेव्हाच लोकसभा निवडणुकीत खैरेंचे डिपाॅझीट जप्त केले नाही, तर भुमरे आडनाव सांगणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यावर खैरे गप्प बसतील तर नवलच.

आज त्यांनी भुमरेंची औकातच काढली. लोकसभा निवडणुकीत माझे डिपाॅझीट जप्त करण्याइतकी भुमरेंची औकात नाही. उलट त्यांना विधानसभेची उमेदवारी आणि मंत्रीपद देखील मीच मिळवून दिले. पण आज ते गद्दार झालेत, अशी टीका खैरेंनी केली. मुळात छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गट लढवणार? की भाजप? हेच अद्याप ठरलेले नाही.

ठाकरे गटाकडून देखील खैरेंनाच उमेदवारी मिळणार, की मग ठाकरेही भाकरी फिरवणार? अद्याप हे देखील स्पष्ट नाही. त्याआधीच जणू काही दोघांचीही उमेदवारी जाहीर झाली, अशा थाटात भुमरे-खैरे एकमेकांवर तुटून पडले आहेत. आता प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत कोण कुणाचे डिपाॅझीट जप्त करणार? याची उत्सूकता मात्र आतापासूनच लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com