Parbhani : कोण होणार काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष ? वरपुडकर स्वत: की त्यांच्या मर्जीतला पदाधिकारी

जरी लोकशाही पध्दतीने निवडणुक घेवून जिल्हाध्यक्ष निवडीचा प्रयत्न केला जात असला तरी त्यात आमदार सुरेश वरपुडकरांचाच प्रभाव राहणार हे निश्चित मानले जात आहे. (Congress)
Parbhani : कोण होणार काॅंग्रेसचा जिल्हाध्यक्ष ? वरपुडकर स्वत: की त्यांच्या मर्जीतला पदाधिकारी
Congress Mla Suresh Warpudkar News, Parbhani News MarathiSarkarnama

परभणी : जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी लोकशाही पध्दतीने निवडणुक प्रक्रिया घेतली जात आहे. (Parbhani) अध्यक्षपदासाठी कॉग्रेसमधून इच्छुकांची संख्या जरी कमी असली तरी विद्यमान अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर हे स्वत: किंवा त्यांच्या मर्जीतील दुसरा एखादा नेता अध्यक्षपदासाठी निवडला जावू शकतो. (Parbhani News Marathi)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने पक्षश्रेष्ठींकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Marathwada) परभणी जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाची (Congress) अनेक ठिकाणी सत्ता आहे. विशेष म्हणजे परभणी शहर महापालिकेवर सध्या कॉग्रेसचा झेंडा होता. सध्या आयुक्त देविदासराव पवार हे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत.

कॉग्रेसच्या अनिता सोनकांबळे या महापौर तर भगवानराव वाघमारे यांच्याकडे उपमहापौर पद होते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थापैकी एक असलेल्या परभणी महापालिकेत कॉग्रेसचाच वरचष्मा आहे. पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर हे स्वताः जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांचा चांगला प्रभाव पक्षातंर्गत व जनमानसात पडतांना दिसतो. (Suresh Warpudkar News)

Congress Mla Suresh Warpudkar News, Parbhani News Marathi
Thackeray : मुख्यमंत्री संतापले, मला कारणे सांगू नका, नागरिकांना पाणी वाढवून कसे देता येईल ते सांगा..

एकीकडे जिल्ह्यात कॉग्रेसचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी कॉग्रेस हा बळकटी प्राप्त करत आहे. शिवसेनाही त्याच पटीने पुढे जातांना दिसत आहे. अशा परिस्थिती जिल्हयातील कॉग्रेसचे नेतृत्व सक्षम असावे असे पक्षातील वरिष्ठांना वाटते. त्यामुळे जरी लोकशाही पध्दतीने निवडणुक घेवून जिल्हाध्यक्ष निवडीचा प्रयत्न केला जात असला तरी त्यात आमदार सुरेश वरपुडकरांचाच प्रभाव राहणार हे निश्चित मानले जात आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने पंजाब येथील सुशीलकुमार मल्होत्रा यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर पुरूषोत्तम हे त्यांना सहकार्य करणार आहेत. परभणी दौऱ्यावर आलेल्या या पक्ष पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२९) येथील बी.रघुनाथ सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in