रस्त्याचे डांबरीकरण करताना कंत्राटदार डांबर टाकायलाच विसरला

नुकत्याच तयार करण्यात आलेला निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सध्या हा रस्ता (Road) जिल्ह्यात चर्चेंचा विषय बनला आहे.
धानोरा- बानेगाव रोड, परभणी
धानोरा- बानेगाव रोड, परभणी

परभणी : यवतमाळ (Yavatmal) जालना (Jalana) जिल्ह्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या धानोरा- बानेगाव रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचे कारणही तसेच आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेला निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सध्या हा रस्ता (Road) जिल्ह्यात चर्चेंचा विषय बनला आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण करताना डांबरच न टाकल्याने रस्त्यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

धानोरा- बानेगाव गावातील धानोरा- बानेगाव रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले पण रस्त्याचे काम करताना कंत्राटदार डांबरच टाकायचे विसरुन गेला असल्याचे चित्र सध्या याठिकाणी तयार झाले आहे. गावातील काही तरुणांनीच या रस्त्याचा पंचनामा केला, असून पायाने उकरणारा रस्ता असे म्हणत, प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

धानोरा- बानेगाव रोड, परभणी
राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना घेतेय तोंड फोडून; मुख्यमंत्र्यांचा चार्ज कोणाकडे तरी द्या...

परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि वैयक्तिक लक्ष घालून रस्ते तयार करीन, असे स्वत: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीच्या गंगाखेड येथे मागच्या रविवारी सांगितलं होतं .

मात्र परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा- बानेगाव रस्त्याची आधीच झालेली दुरावस्था आणि आता डांबरी करणाच्या नावाखाली फक्त खडे आणि माती टाकून रस्ता बनवल्याचे येथील युवकांचे म्हणणे आहे. अशातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या परभणीच चर्चेचा विषय बनला बनलेला आहे. हा रस्ता बांधण्यासाठी तब्बद दीड कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले होते. मात्र रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने कंत्राटदार आणि नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधितांसाठी येणाऱ्या दिवसात अडचणीची ठरू शकते, असेही दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com