उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी उस्मानाबादमध्ये आई तुळजा भवानीसह, गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसेच यशस्विनी अभियान बैठक आणि राष्ट्रवादी (NCP) संपर्क कार्यालयालाही भेटी दिल्या. संत गोरोबा काकाचे दर्शन घेऊ त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. (Supriya Sule latest news)
यावेळी स्थानिक माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. देवीकडे काय मागणी केली, असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी देवाकडे काही मागायला आले नाही. उलट जे मिळालं आहे त्याचे आभार मानायला येते. पण मंदिरात उपस्थितांनी आग्रह केल्याने, चांगला पाऊस पडू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे, आणि देशावर आलेलं संकट टळू दे, राज्यातला बळीराजा सुखी होवू दे, असं साकडं आई तुळजा भवानीला घातल्यांच त्यांनी सांगितलं.
दरम्यान याचवेळी त्यांना राज्याला महिल्या मुख्यमंत्री कधी मिळतील, असा सवाल केला, यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी काही ज्योतिषी नाही, पण मी मुख्यमंत्री व्हावं की नाही, हे महाराष्ट्रातले लोक ठरवतील. ते मी कसं ठरणार असं उत्तर दिल.
तसेच, राज्यात दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे. पण अजून राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवीच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.